शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा पॅकेजमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 23:50 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कुठलीही ठोस तरतूद नसल्याने केंद्र शासनाने ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी कुठलीही ठोस तरतूद नसल्याने केंद्र शासनाने ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी विशेष तरतूद करावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे.याबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी  यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  देशात निर्माण झालेल्या परिस्थितीत विविध उपाययोजना केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी नुकतेच आपण २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये विविध क्षेत्रांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.  देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या आणि अत्यावश्यक सेवेत महत्त्वाचीभूमिका बजावणाऱ्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला केंद्र सरकारच्या आर्थिक पॅकेजमध्ये वाटा मिळालेला नसल्याने परिणामी अगोदरच संकटात सापडलेल्या ट्रान्सपोर्ट क्षेत्राला यामुळे अधिक फटका बसणार असून, याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अत्यावश्यकसेवेत आपली महत्त्वाची  भूमिका बाजवणा-या ट्रान्सपोर्ट उद्योगाला विशेष पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.-----तीव्र नाराजीदेशात अत्यावश्यक सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाºया ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मात्र कुठलीही ठोस आर्थिक मदत जाहीर करण्यात न आल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून काम करणारे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील सर्व घटक केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तीव्र नाराजीपसरली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक