शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साताळीसह १७ गावे दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:17 IST

येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह १७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या गावांवर केला. दुष्काळी गावांना मिळणाऱ्या सवलतीपासून सर्व शेतकरी, शेतमजुरी वंचित राहणार असल्याने या गावात व परिसरात तीव्र असंतोष आहे.

ठळक मुद्देमागणी : येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह १७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या गावांवर केला. दुष्काळी गावांना मिळणाऱ्या सवलतीपासून सर्व शेतकरी, शेतमजुरी वंचित राहणार असल्याने या गावात व परिसरात तीव्र असंतोष आहे. शहरात पाऊस पडतो मात्र हा लहरी पाऊस शहराच्या दिड किमी परिसरात देखील पडत नाही. त्यात साताळीसह १७ गावे येवला मंडळामध्ये येत असल्याने आणि मंडळनिहाय दुष्काळ याद्या जाहिर केल्याने या गावावर अन्याय झाला असून शासनाने तात्काळ या गावाची पहाणी करावी व या गावांचा दुष्काळ यादीत समावेश करावा या एकाच मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी पंचायतीचे राज्य संघटक व साताळी ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष व अर्जुन कोकाटे यांचे नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयासमोर जवळपास दोन तास धरणे धरण्यात आले. त्यानंतर तहसीलदार देवीदास वारूळे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात साताळीसह १७ गावांचा तात्काळ समावेश करावा मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या धरणे आंदोलनात अर्जुन कोकाटे, पुंजाराम काळे, भाऊसाहेब जगताप, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव काळे, कचरू आहेर, भाऊसाहेब कोकाटे, जालिंदर कोकाटे, दादाभाऊ सोनवणे, बाळासाहेब कोकाटे, साहेबराव कोकाटे, शरद काळे, अमोल सोनवणे, तुषार सोनवणे, दशरथ जाधव, मच्छिंद्र कोकाटे, बबन काळे, रामदास कोकाटे, दत्तु काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.