शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने २५ हजार हेक्टरवरील पिके बाधित,  भाजीपाला, फळझाडांचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 20:11 IST

कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्दे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यतासरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला

नाशिक : आॅक्टोबरच्या पहिल्या तारखेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरहून अधिक शेती पिकांचे नुकसान केले असून, पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकºयांची संख्या जवळपास ५० हजारांच्या आसपास आहे. या संदर्भात कृषी खात्याने अलीकडेच केलेल्या प्राथमिक पाहणीत ही बाब निदर्शनास आली असून, प्रत्यक्ष पंचनाम्यात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व व मान्सूनच्या पावसाने लावलेली हजेरी तब्बल चार महिने कायम होती. जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत यंदा १२५ टक्के पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यांपर्यंत खरीप हंगामासाठी या पावसाची शेतकर्‍याना गरज असल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर चांगला परिणाम झाला असला तरी, पावसाचा जोर आॅक्टोबर महिन्यात कायम राहिला. वादळी वारा, विजेचा कडकडाट व तुफान कोसळलेल्या या पावसाने शेती पिकांची अक्षरश: धुळधाण उडविली. त्यात भात, नागली, वरई, बाजारी, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, मका या जिरायती क्षेत्रातील पिकांची, तर बागायती क्षेत्रातील द्राक्ष, कांदा, ऊस व भाजीपाला ही पिके नष्ट झाली. द्राक्षबागांच्या ऐन छाटणीच्या व झाडाने फुल धरण्याच्या काळातच बेमोसमी पाऊस झाल्याने झाडांची फुले गळून पडली, तर हाती आलेला कांदा भुईसपाट झाला.अवकाळी पावसाने शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी, शासनाकडून नुकसानभरपाई वा पंचनामे करण्याची सूचना नसली तरी, शेतकर्‍याचा त्यासाठी येणारा दबाव पाहता कृषी विभागाने प्राथमिक पातळीवर अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यात जिल्ह्यातील ६६२ गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले असून, त्याचा फटका ४८,१८४ शेतकर्‍याना बसला आहे.कृषी खात्याने केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील १२,८८८ हेक्टर क्षेत्रावरील भात, नागली, बाजारी, भुईमूग, सोयाबीन व मका या जिरायती क्षेत्रातील शेती पिकांचे, तर १०,२७४ हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, भाजीपाला या बागायती क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे विस्तृत पंचनामे अद्याप बाकी असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती