नाशिक : कंपनीतून कामावरून घरी जाणाऱ्या युवकाला एकटे गाठून त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना गडकरी सिग्नलजवळ सोमवारी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली़ या युवकावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप हॉटेलजवळील आरती सोसायटीत राहणारा संदीप सुरेश गांगुर्डे हा युवक सातपूरला एका औषधाच्या कंपनीत कामाला जातो़ सोमवारी रात्री ड्यूटी संपल्यानंतर रात्री तो ठक्कर बजारजवळ उतरला़ एक वाजेच्या सुमारास तो घरी पायी जात असताना जनलक्ष्मी बँकेजवळ काळ्या पल्सरवरील तिघांनी त्यास अडविले़ त्याच्याकडे पैशाची मागणी करून त्यास मारहाण केली, तर एकाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले़ यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
युवकावर चाकूहल्ला करून लूट गडकरी सिग्नलजवळील घटना
By admin | Updated: November 12, 2014 01:22 IST