शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 21:17 IST

सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे१२० रुग्णांना २४ तास पुरेल एवढी क्षमता असलेला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प मंजूर

सिन्नर : येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आमदार कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, तहसीलदार राहुल कोताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, मेघा दराडे आदी उपस्थित होते.यावेळी आमदार कोकाटे म्हणाले, संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोना संकटाचा सामना करताना उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या लोकार्पणाची वाट न बघता या इमारतीत लोकसहभागातून साहित्य मिळवून डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरू करून तालुक्यातील हजारो रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले; मात्र ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना सुविधा देताना अडचणी आल्या. त्यामुळे यापुढे ऑक्सिजनअभावी कोणीही रुग्ण दगावू नये यासाठी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प असावा यासाठी आपण मागणी करून भुजबळ यांच्या सहकार्यातून १२० रुग्णांना २४ तास पुरेल एवढी क्षमता असलेला ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाचा आगामी काळात रुग्णांना आरोग्यसेवा देताना लाभ होणार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा देण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागापुढे उभे असताना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या रुग्णालयात वेळीच कोविड सेंटर सुरू झाल्याने तालुक्यातील रुग्णांसह आजूबाजूच्या तालुक्यातील कोरोनाबाधित आपल्या रुग्णालयात उपचार घेत ठणठणीत बरे झाले असल्याचे डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले.दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहिकाकोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सेविकांनी झोकून देऊन काम केले. तसेच कार्यकर्त्यांनीदेखील जिवाची पर्वा न करता केलेली रुग्णसेवा अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. पुढील काळात तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या दहा ग्रामपंचायतींना रुग्णवाहिका देण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsinnar-acसिन्नर