शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयातील नवीन न्यायालयीन कक्षाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:08 IST

जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि़४) करण्यात आले़

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या हस्ते सोमवारी (दि़४) करण्यात आले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आऱ आऱ हांडे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.  जिल्हा न्यायालयातील वाढते दावे, खटले तसेच वकिलांची संख्या पाहता न्यायालयाचे विस्तारीकरण होणे गरजेचे होते़ सद्यस्थितीतील जागा अपुरी पडत असल्याने  न्यायालयालगतची पोलिसांच्या ताब्यातील पाच एकर जागेची मागणी जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती़ नाशिक बार असोसिएशन व अ‍ॅड़ का़ का़ घुगे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार उच्च न्यायालयाने पोलिसांकडील अडीच एकर जागा देण्याचे आदेश दिल्यानंतर जागेचे हस्तांतर करण्यात आले़ या जागेवर सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर १२ मध्ये चार दिवाणी न्यायालयांसाठी नवीन कक्ष तयार करण्याचे आदेश प्रधान न्यायाधीश शिंदे यांनी दिले होते़न्यायालयास मिळालेल्या या जागेवरील बॅरेक नंबर बारामध्ये चार नवीन न्यायालयीन कक्ष तयार करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले़ या ठिकाणी चार दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालये स्थलांतरित करण्यात आली असून, त्यांचे कामकाजही आजपासून सुरू करण्यात आले़ जिल्हा न्यायालय प्रशासन व नाशिक बार असोसिएशन यांनी नूतन कक्षाच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन केले होते़ यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष सुधीरकुमार बुक्के, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजय मिसर, अ‍ॅड. श्रीधर माने, असोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड. प्रकाश आहुजा, अ‍ॅड. जालिंदर ताडगे, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. श्यामला दीक्षित, अ‍ॅड. संजय गिते, अ‍ॅड. हर्षल केंगे, अ‍ॅड. महेश लोहिते यांसह वकील व न्यायाधीश मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :Nashikनाशिक