सिन्नर : शहरालगतच्या सरदवाडी रस्त्यावरील झापवाडी येथे शुक्रवारी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते आमदार चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेचे सर्व सामने प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत. परिसरात प्रथमच अशा प्रकारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने सामने बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. झापवाडी येथील बजरंग मित्रमंडळ व शिवसेना शाखेच्या वतीने या आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत यश मिळविणाऱ्या पहिल्या पाच संघांना अनुक्रमे पंधरा, अकरा, सात, पाच व तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सलग चार चौकार किंवा सलग तीन बळी घेणाऱ्या खेळाडूंनाही प्रत्येकी एक हजार एक रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. सलामीच्या अत्यंत रोमहर्षक झालेल्या लढतीत सरदवाडी संघाने धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात वडगाव-सिन्नर संघावर विजय मिळवला.याप्रसंगी नगरपालिकेचे गटनेता विजय जाधव, माजी नगरसेवक गोविंद लोखंडे, डॉ. संदीप मोरे, पिराजी पवार, विलास तांबे, समाधान गायकवाड, शंकर झगडे, विजय कदम, सुरेश शिंदे, योगेश शिंदे, सदाशिव विसे, पोपट बिन्नर, रमेश शिंदे, मारुती नवाळे, विलास झगडे, रामराव जाधव, दत्तात्रय झगडे, राजेंद्र वारुंगसे, पिंटू वाजे, किशोर रसाळ, जितेंद्र गोळेसर, रमेश वल्टे, राजेंद्र झगडे, शिरीष ठाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते.जय बजरंग मित्रमंडळ व शिवसेना शाखेचे प्रमुख पंकज मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रकाशझोतातील सामने बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. (वार्ताहर)
आमदार चषक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Updated: April 16, 2016 22:41 IST