नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने जेम्स ॲन्थोनी मेमोरियल फ्रेंडशिप क्रिकेट स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन रोसाम्मा ॲन्थोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव समीर रकटे, पोलीस उपआयुक्त हरीश बैजल, शेखर गवळी, राजू अहेर, मंगेश शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरची स्पर्धा महात्मानगर मैदान व गोल्फ क्लब मैदान येथे होणार असून, स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघाला साखळीत चार सामने खेळावे लागतील. फोटो : २९पीएचएमए६१गोल्फ क्लब मैदान येथे जेम्स ॲन्थोनी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी समीर रकटे, हरीश बैजल, रोसाम्मा ॲन्थोनी, शेखर गवळी आदिंसह खेळाडू.
जेम्स ॲन्थोनी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Updated: May 30, 2014 01:05 IST