शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जमीन महसुलाच्या फाइलींची अडवणूक

By admin | Updated: April 1, 2017 00:44 IST

जमीनविषयक प्रकरणातून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळणार आहे, त्या फायलीच दडवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडला

नाशिक : मार्चअखेरचे शासनाने महसूल वसुलीचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी धावाधाव करीत असताना दुसरीकडे मात्र ज्या जमीनविषयक प्रकरणातून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळणार आहे, त्या फायलीच दडवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयात घडला असून, त्यामागचे कारण समजू शकत नसले तरी, सारा प्रकार संशयास्पद आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला यंदा शासनाने २०९ कोटी रुपये महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट दिलले होते. गेल्या वर्षापेक्षा म्हणजेच सन २०१५ - १६ च्या तुलनेत हे उद्दिष्ट अधिक असल्याने त्या प्रमाणात महसूल गोळा करण्यासाठी महसूल खात्याला प्रचंड धावपळ करावी लागली. यंदा वसुलीची सारी परिस्थिती बदलली असून, वर्षभरात जेमतेम नऊ वाळू ठिय्यांचा लिलाव होऊ शकल्याने त्यापोटी अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. तसाच प्रकार करमणूक कर वसुलीच्याबाबतीत घडला आहे, गौरखनिजाच्या उत्खननातून मिळणाऱ्या उत्पन्नातही मोठी घट झाली असल्यामुळे महसूल खात्याची हक्काची वसुली घटली आहे. त्यामुळे जमीन विषयक महसुलावर महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भर देत त्यासाठी नवीन शर्तींच्या जमिनींचे, इनाम व वतनाच्या जमिनींचे व्यवहारांचे शोध घेण्यात आले. अशा व्यवहारापोटी शासनाला नजराणापोटी कोट्यवधी रुपये मिळणार असल्याने जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्या मालकांची मनधरणी करून त्यांना पैसे भरण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यासाठी तहसील पातळीवर या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी फायली पाठविण्यात आल्या आहेत, परंतु महिन्याचा कालावधी उलटूनही या फायलींवरील धूळ झाडण्यात आलेली नाही. परिणामी शासनाला महसुलापोटी मिळू शकणाऱ्या कोट्यवधी रुपयांपासून वंचित राहण्याची वेळ आली.  जिल्हाधिकारी कार्यालयात या फायली अडविण्यामागचे कारण समजू शकले नसले तरी, १ एप्रिलपासून जमिनींचे बाजारमूल्य (रेडीरेकनर) वाढण्याचे संकेत मिळत असल्याने घेतलेल्या जमिनींचा नजराणा तत्पूर्वी भरून टाकण्यासाठी जमीनमालक जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत, मात्र ज्या कोणा अधिकाऱ्याच्या अखत्यारित या बाबी येतात ते अधिकारी फायलींवर स्वाक्षरीच करीत नसल्याने त्यांच्या कामकाजावर संशय घेत शुक्रवारी काही नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. ‘त्या’ फाइलींचा निपटारा तत्काळएकीकडे मासिक बैठकांमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावायचा आणि दुसरीकडे त्यांना उत्पन्न मिळवून देणाऱ्या फायली अडविण्याचा हा सारा प्रकार संशयास्पद असून, ज्या फाईलींमध्ये ‘देव-घेव’ झाली त्यांचा निपटारा मात्र तत्काळ करण्यात आला आहे.