शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पाच लाखाच्या खंडणीसाठी दुकानदाराला बॉम्बने उडविण्याची धमकी; दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2023 16:43 IST

पथकाकडून बॉम्ब निकामी, गुळवंच येथील प्रकार, भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला.

शैलेश कर्पे

सिन्नर (जि. नाशिक) - तालुक्यातील गुळवंच येथील किराणा दुकानदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी करीत पैसे न दिल्यास कुटुंबियास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत बंदुकीच्या सहाय्याने दुकानदार व त्याच्या पत्नीस मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघा संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सोमवारी (दि.३) तालुक्यातील गुळवंच येथे चंद्रकांत विठ्ठल आंबेकर (५६) यांचे श्रीराम किराणा दुकान आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास गावातीलच विष्णू एकनाथ भाबड व बबन मल्हारी भाबड हे दोघे आंबेकर यांच्या दुकानात गेले. संशयित विष्णू भाबड यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी आंबेकर यांच्याकडे खताच्या गोण्या उधार मागितल्या होत्या, तेव्हा भाबड याने आंबेकर यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आंबेकर हे किराणा दुकानाच्या पायरीवर बसलेले असतांना संशयित भाबड यांनी आंबेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुकानात जावून चंद्रकांत आंबेकर बंदुकीने डोळ्यावर व त्यांच्या पत्नी यांना डोक्यावर मारहाण केली. सोबत असलेल्या स्टीलच्या डब्यातील बॉम्ब सदृश्य वस्तूचा दाखवून पाच लाख रुपयांची मागणी केली. पाच लाख रुपये न दिल्यास आंबेकर यांना व कुटुंबियांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सदर डब्यात गावठी पेट्रोल बॉम्ब व सुतळी बॉम्ब असल्याचे समजते.

भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने धमकी देणारा संशयित पळाला. पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळू लोंढे, हवालदार भगवान शिंदे, विनोद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. त्यानंतर तातडीने मालेगाव येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत पोलीस पथक मंगळवारी पहाटे सहा वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते.

पहाटे सहा वाजता मालेगाव येथील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बॉम्ब निकामी केल्यानंतर पोलिस मुख्य संशयित विष्णू एकनाथ भाबड याचा शोध घेत होते. भाबड याने रात्रीचा प्रकार घडल्यानंतर घरी जाऊन झोपेच्या गोळ्या घेतल्याचे समजते. भाबड याने स्वत: बॉम्ब बनवला की दुसऱ्या कडून बनवून घेतला याबाबत पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, अन्य एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.

पोलीस अधीक्षक उमाप यांची घटनास्थळी भेटघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांनी घटनास्थळी गुळवंच येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी तपासकामी एमआयडीसी पोलिसांना सूचना केल्या.