शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये एम.डी ड्रग्जच्या कारखान्यापाठोपाठ कच्च्या मालाचे गुदामही उद्धवस्त

By अझहर शेख | Updated: October 8, 2023 10:31 IST

शिंदे गावातील एका पत्र्याच्या मोठ्या गुदामामध्ये ड्रग्जच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता.

नाशिक : साकीनाका पोलिसांनी शिंदे गावातील एम.डी ड्रग्ज बनविणारा कारखाना उद्धवस्त केल्याच्या घटनेपाठोपाठ आता नाशिक पोलिसांनी शनिवारी (दि.७) रात्री छापा टाकला. शिंदे गावातील एका पत्र्याच्या मोठ्या गुदामामध्ये ड्रग्जच्या कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी हा मोठा साठा हस्तगत केला आहे. सुमारे ३००कोटींच्या घरात या कच्च्या मालाची किंमत असल्याचे बोलले जात आहे.

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी शिंदेगाव नायगावरोड एमआयडीसी भागातील एम.डी अंमली पदार्थाचा कारखाना शोधून तो उध्वस्त केला होता. शुक्रवारी हे पथक कारवाई करून परतत नाही, तोच शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलिसांनी शिंदेगाव कॅनॉललगत असलेल्या भाडेतत्वावरील पत्र्याचे एक संशयास्पद गुदाम शोधून काढले. मिळालेल्या गोपनीयी खात्रीलायक माहितीवरून या गुदामातूनच कच्चा मालाचा पुरवठा त्या कारखान्यासाठी केला जात होता. यामुळे पोलिसांनी कटरच्या सहाय्याने पत्रे कापून आतमध्ये प्रवेश केला असता प्लॅस्टिकच्या मोठ्या ड्रममध्ये रासायनिक द्रवरूपपदार्थाचा साठा आढळून आला. या साठ्याचा वापर एम.डी सारखे घातक अमली पदार्थ बनविण्यासाठी केला जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड, गणेश शेळके, सुवर्णा हांडोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी शनिवारी शिंदेगाव कॅनलरोडलगत असलेल्या दत्तू जाधव यांनी बांधलेल्या गाळ्याकडे आपला मोर्चा वळविला. पहिलाच जो गाळा भाड्याने दिला आहे त्याचे शटर उघडत नसल्याने पोलिसांनी बाजूच्या गाळ्याचे शटर उघडून दोन्हीही गाळ्यामध्ये असलेल्या पत्र्याच्या पार्टिशनचा एक पत्र खोलून एक नंबरच्या गाळ्यात प्रवेश केला. त्या गाड्यांमध्ये एमडी व बनविण्याचा कच्चामालाचा साठा आढळून आला हे. मध्यरात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशीरापर्यंत सुरू होती.

सकाळी जनजागृती; संध्याकाळी ‘इफेक्ट’

शनिवारी पोलिसांनी शिंदे भागामध्ये पेट्रोलिंग करत जनजागृती केली होती. यावेळी नागरिकांनी कुठे गोडाऊन अथवा भाड्याने घेतलेली जागा असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर शिंदे गावातील रहिवाशी दत्तू जाधव यांनी कॅनॉलरोडलगत भाड्याने दिलेल्या एका गाळ्यामध्ये कारखान्यातील छाप्यात छाप्यात जशा वस्तू व ड्रम आढळून आले तसे गाळ्यात साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना कळविली.हे साहित्य केले जप्तअंमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सात ते आठ प्लॅस्टिक व लोखंडाचे मोठे ड्रम व त्यामध्ये रासायनिक द्रवरूप पदार्थ ज्याचा वास अत्यंत उग्र स्वरूपाचा होता. काचेचे ब्लोअर आदी कोट्यवधी रुपयाचा माल व साठा जप्त केला आहे. कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल साठविण्यासाठी या गाळ्याचा वापर गुदाम म्हणून केला जात होता, असे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले.