शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 10:10 IST

गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले.

नाशिक -  देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे खालप चौफुलीलगत राहणाऱ्या शेतकरी कुटुंबातील तरुणाने व्हाटसअ‍ॅप स्टेटसवर स्वतः सह बायको-मुलांच्या फोटोंसह खाली भावपूर्ण श्रद्धांजलीची पोस्ट टाकत आधी पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली व नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.३०) सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत पती गोविंद शेवाळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

रविवारी सकाळी ६:५१ वाजता गृहरक्षक दलात कर्मचारी असलेल्या गोविंद शेवाळे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर स्वतःच्या कुटुंबीयांच्या फोटोखाली भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस टाकले होते. हे स्टेटस परिसरातील मित्रमंडळी व नातेवाइकांनी बघितल्यानंतर सर्वजण अचंबित झाले व याबाबत सरपंच लंकेश बागुल यांना माहिती देण्यात आली. गावातील काही नागरिकांसह सरपंच लंकेश बागुल व पोलिस पाटील वैशाली वाघ यांनी तत्काळ गोविंद शेवाळे यांच्या शेतावर जाऊन घराचे दार उघडले असता त्यांना हृदयद्रावक दृश्य दिसले. बागुल यांनी घटनेची माहीती देवळा पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षकासह कर्मचारी घटनास्थळी पोहचले. या वेळेपर्यंत घटनेची माहिती वेगाने सर्वत्र पसरली.

पोलिसांनी घरात प्रवेश केला असता गोविंद बाळू शेवाळे (४०) हे दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले, तर पत्नी कोमल (३५), मुलगी हर्षाली (९) आणि मुलगा शिवम (२) हे तिघेही मृतावस्थेत आढळले. नाशिक येथून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. त्यांनी परिसराची तपासणी केली आहे. घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कारण अद्याप अस्पष्ट

चारही मृतदेह पंचनामा पूर्ण झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी देवळा रुग्णालयात रवाना करण्यात आले. डॉक्टरांकडून मिळणारा अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरणार असून त्यानंतरच मृत्यूच्या कारणाबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. शेवाळे कुटुंब शांत स्वभावाचे होते, असे स्थानिकांनी सांगितले आहे. आर्थिक किंवा कौटुंबिक वादाची तक्रार नसताना असा प्रकार घडल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सार्थक नेहेते करीत आहेत. रविवारी सकाळी ६:५१ वाजता गोविंद शेवाळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर आपल्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट ठेवली होती. ह्या पोस्टमुळे घटना पूर्वनियोजित होती का? याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

प्राथमिक तपासानुसार, पतीने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. पतीनेच पत्नीला आणि दोन्ही मुलांना जीवे ठार मारले असावे, असा अंदाज आहे. घरातील प्रत्येक पुरावा तपासला जात आहे. डिजिटल मोबाइल डेटा, स्टेटस पोस्ट व घटनास्थळी मिळालेली माहिती यावरून तपासाला दिशा मिळत आहे. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. - सार्थक नेहेते, पोलिस निरीक्षक, देवळा

English
हिंदी सारांश
Web Title : Man Kills Wife, Children, Posts WhatsApp Status, Then Commits Suicide

Web Summary : In a shocking incident in Nashik, a man killed his wife and two children before taking his own life after posting a farewell message on WhatsApp. Police are investigating the motive behind the tragic event that has left the community in mourning.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी