शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोच्या भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:44 IST

नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.

पंचवटी : गेल्या वर्षी टोमॅटो मालाची प्रचंड लागवड झाल्याने बाजारभाव पूर्णपणे घसरले होते. लागवड तसेच उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने व त्यातच कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकºयांनी टोमॅटोचा खुडा बंद केला होता तर काहींनी शेतातील उभ्या पिकाकडे दुर्लक्ष करून टोमॅटो जनावरांना सोडून दिला होता. मात्र नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.गेल्यावर्षी तीन ते चार रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया टोमॅटो मालाला शेतकºयांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाला १५ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठवडाभरापासून बाजारभावात तेजी निर्माण झाली आहे.नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई शहर तसेच डहाणू व पालघर या उपनगरात निर्यात केली जात आहे. गुजरात राज्यात सध्या स्थानिक शेतमालाची आवक सुरू झाल्याने गुजरातला नाशिकमधून टोमॅटो मालाची निर्यात बंदच आहे. जुलै ते सप्टेंबर हा टोमॅटो उत्पादनाचा हंगाम असून गेल्यावर्षी याच कालावधीत टोमॅटो मालाची प्रचंड उत्पादन वाढल्याने त्यातच पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने बाजारभाव ४ रुपये किलोपर्यंत कोलमडले होते. उत्पादन तसेच लागवड खर्च न सुटल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून शेतातील उभ्या टोमॅटोच्या पिकाकडे पाठ फिरविली होती. सध्या हिवाळा सुरू असल्याने तसेच अनेक शेतकºयांनी बाजारभाव नसल्याने यापूर्वीच टोमॅटो पीक काढून टाकल्याने आवक घटली आहे. सध्या बाजारात नवीन टोमॅटो माल विक्रीसाठी दाखल होत असल्याने व आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. टोमॅटोच्या २० किलो वजनी प्रति जाळीला ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने या बाजारभावामुळे शेतकºयांनी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी