शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

हॉकर्स झोनमध्ये आता बदल अशक्य आयुक्त : झोनमध्ये बदल सुचविताना पर्यायही द्यावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:43 IST

नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणानुसार शहराचा हॉकर्स झोनचा आराखडा तयार होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींना पर्यायही द्यावे लागणार झोनच्या आराखड्यात मंजुरी

नाशिक : राष्टÑीय फेरीवाला धोरणानुसार शहराचा हॉकर्स झोनचा आराखडा तयार होऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झालेली आहे. आता त्यात काही चुकीचे काम झाले असेल तर दुरुस्त्या केल्या जातील परंतु, दुरुस्त्या सुचविताना लोकप्रतिनिधींना पर्यायही द्यावे लागणार आहे. त्याशिवाय, झोनमध्ये बदल होऊ शकणार नसल्याचे महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट केले आहे.बुधवारी (दि.४) झालेल्या महासभेत हॉकर्स झोनच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असता सदस्यांनी हॉकर्स झोनमध्ये चुकीच्या पद्धतीने काम झाल्याचा आरोप केला होता. सदर हॉकर्स झोनच्या आराखड्यात बदल सुचविण्यासाठी स्वतंत्र महासभा बोलाविण्याची मागणीही सदस्यांनी केली होती. त्यानुसार, महापौर रंजना भानसी यांनी हॉकर्स झोनसंबंधी सूचनांकरिता विशेष महासभा बोलविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, हॉकर्स झोनच्या आराखड्यात महासभेनेच मंजुरी दिलेली आहे. त्यानुसारच प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे. हॉकर्स झोनमध्ये काही क्षेत्र निश्चित करताना चुका झाल्या असतील तर त्यात दुरुस्ती केली जाईल. परंतु, त्यात बदल करताना लोकप्रतिनिधींना पर्यायही द्यावे लागणार आहेत. पर्याय दिल्याशिवाय हॉकर्स झोनच्या आराखड्यात बदल अशक्य असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, हॉकर्स झोन आराखड्यानुसार सहाही विभागात झोनमध्ये विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू असून, त्यासंदर्भातील फलकही लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात हॉकर्स झोनच्या बाबतीत सर्वाधिक काम हे नाशिक महापालिकेमार्फत सुरू असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे.