शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: June 6, 2017 03:46 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान क्रांती मोर्चातर्फे आयोजित राज्यव्यापी बंदला नाशिक जिल्ह्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे प्रकार तर खडक माळेगाव येथे झालेला लाठीमार असे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. ठिकठिकाणी झालेले रास्तारोको, मुख्यमंत्री आणि सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन,मेणबत्ती मोर्चा आदिंनी हे आंदोलन झाले.यामुळे ग्रामीण भागातील उलाढाल तसेच व्यवहार ठप्प झाले होते. शहरात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला.किसान क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. या बंदला विविध पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा जाहीर केला होता.सर्वच ठिकाणी सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. मात्र या बंदचे शहार भागामध्ये फारसा परिणाम जाणवला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांसह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. निफाड, कळवण, दिंडोरी,सुरगाणा, मालेगाव, येवला, त्र्यंबकेश्वर, सिन्नर अशा सर्वच तालुक्यांमध्ये आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे रास्तारोको आंदोलन करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे काही तरुण शेतकऱ्यांनी मुंबई- आग्रा महामार्गावर जळती टायर टाकून रास्तारोको केले. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात आंदोलकांनी एस. टी. बसवर दगडपेक करून काचा फोडल्या.विविध ठिकाणी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसच सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.