शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

आरोग्य विद्यापीठाचा जागतिक स्तरावर ठसा उमटवा ; राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 18:12 IST

कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रांतील विद्यार्थ्यांचे कार्य महत्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्रध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पदवीदान सोहळा ऑऩलाईनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ऑलाईन मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविण्याचे आवाहन

नाशिक : कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रांतील विद्यार्थ्यांचे कार्य महत्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्रध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.२९ ) ऑनलाईन पद्धीतीने पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही.कळसकर आदी उपस्थित होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. त्यामुळे या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी विद्यापीठाने प्रयत्नशिल रहावे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन जागतिक स्तरावर विद्यापीठाचा ठसा उमटविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर कुरुगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा सादर करतानाच विद्यापीठ आवारात लवकरच विविध वैद्यकीय अभ्यसक्रमांचे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले.

महाविद्यालयाचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत असलेले प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरच मार्गी लागतील. विद्यापीठ आवारात लवकरच वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. याबाबत शासनाकडे कार्यवाही सुरु असून काम अंतीम टप्प्यात आहे.  - डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू

८५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तिघांना पीएचडी.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या ८ हजार ६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात वेगवेगळ्या विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८५ विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या ३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMedicalवैद्यकीयuniversityविद्यापीठbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी