शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

कृषी क्षेत्रातील अत्यंत  महत्त्वाच्या मुद्द्यांनाच बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

या अर्थसंकल्पात आपण ९१ साली स्वीकारलेल्या उदारीकरणाचा (सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण) राहिलेला काही भाग व समाजवादी धोरणांतील कल्याणकारी योजना (उज्ज्वला व काही भिकवादी योजना) यांची सरमिसळ करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे.

या अर्थसंकल्पात आपण ९१ साली स्वीकारलेल्या उदारीकरणाचा (सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण) राहिलेला काही भाग व समाजवादी धोरणांतील कल्याणकारी योजना (उज्ज्वला व काही भिकवादी योजना) यांची सरमिसळ करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. सरकार म्हणून या अर्थसंकल्पाला काहीएक विशिष्ट तत्त्वज्ञान वा दिशा आहे तसे दिसत नाही. नाही तरी अर्थसंकल्पांची भाषा काहीही असली तरी शेवटी ते कसे राबविले जाते याबद्दलची आपल्याकडे यंत्रणा नसल्याने अर्थसंकल्पाच्या गोड गोड भाषेवरच अर्थसंकल्प साजरा करावा लागतो. शेतकऱ्यांबद्दल अनेक योजना वा तरतुदी या अर्थसंकल्पात असल्या तरी मुळात शेतकरी हा देशातला एक उत्पादक वर्ग आहे असे न समजता त्याला गाव, गरिबीच्या पातळीवर आणून मदतपात्र ठरवले आहे. शेतीची प्रमुख अंगे म्हणजे उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान व निर्यात याबद्दल चकार शब्द ही न काढता शेतकरी उत्पादक गट वा संस्था तयार करणार असे सांगण्यात आले आहे. चौदापासून प्रत्येक अर्थसंकल्पात स्थान असलेला देशात मुक्त एकल बाजारासाठी काही तरी तरतूद असे त्याचा यात साधा उल्लेखही नाही. किमान हमी दर देता यावा म्हणून बाजार स्थिरीकरण निधी तोही कुठे दिसत नाही. बाजार समित्यांमध्ये अनेक सुधार अपेक्षित आहेत त्याबद्दल ही सुतोवाच नाही. म्हणजे शेतमालाला रास्त भाव मिळावा, त्यावरच्या प्रक्रिया उद्योगाबाबत वा सुधारित निर्यात धोरणांबद्दलही काही योजना नाहीत. एकंदरीत हा अर्थसंकल्प हा कृषी क्षेत्राची निराशा करणारा दिसतो.देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करणे शेतीतून शक्य नाही़ औद्योगिक क्षेत्र अपयशी ठरल्याने केवळ सेवा क्षेत्रावर एवढी जबाबदारी टाकणार असे दिसते. शेतीतील गुंतवणूक, बाजार सुधार, साठवणूक, प्रक्रि या, निर्यात याबद्दल काही एक न करता सरकार आपली ही उद्दिष्ट कशी साध्य करेल, असा प्रश्न निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे असे म्हणावे लागेल़  - गिरीधर पाटील, कृषी अर्थतज्ज्ञ

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Agriculture Sectorशेती क्षेत्र