शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कळवण उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणी यंत्रणा कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:51 IST

जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेतली दखल

ठळक मुद्देमहालॅबमधील संबधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सुचना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली आहे.

कळवण : कळवण उपजिल्हा रु ग्णालय आणि शासन नियंत्रित महालॅब यांच्यात समन्वय नसल्याने जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याऐवजी महिलेची हेळसांड झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली असून उपजिल्हा रु ग्णालय आणि महालॅब यांच्याकडे विचारणा केली आहे. दाम्यान, उपजिल्हा रु ग्णालयातील सीबीसी यंत्रसामुग्री संबंधित कंपनीकडून तात्काळ दुरु स्त करण्यात येऊन कार्यान्वित झाल्याने सीबीसीसह रक्ताच्या सर्व तपासण्या उपजिल्हा रु ग्णालयात केल्या जाणार आहेत.कळवण उपजिल्हा रु ग्णालयात सर्व रक्त तपासण्या केल्या जातात. मात्र काही महिन्यांपासून यंत्रणा नादुरु स्त व तपासणीसाठी लागणाऱ्या रसायनांचा नियमित पुरवठा होत नसल्याने वरीष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात येऊन देखील दखल घेतली जात नव्हती. शनिवारी (दि.९) लोकमतमध्ये याबाबतचे वृत्त झळकताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. सीबीसी यंत्रसामुग्रीच्या दुरु स्तीसह त्यासाठी आवश्यक रसायन उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य रु ग्णांची हेळसांड आता थांबणार आहे.शासनाने सर्वसामान्य रु ग्णांसाठी वेगवेगळ्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहचवल्या खऱ्या मात्र स्थानिक पातळीवर या सुविधांच्या ढिसाळ कारभारामुळे रु ग्णांची हेळसांड होत असल्याचे जागतिक महिला दिनी एका वयोवृद्ध महिलेला व तालुक्यातील काही रु ग्णांना अनुभवास आल्याने शासनाच्या आरोग्य यंत्रणेबाबत रु ग्ण व नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. उपजिल्हा रु ग्णालय आणि महालॅब यांच्यात समन्वय नसल्याचे समोर आले होते.कारवाईच्या सूचनायंत्रणा नादुरुस्तीसंदर्भात उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाने महालॅबकडे चौकशी केली असता कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. सीबीसी तपासणी महालॅबमध्ये होणार नाही, असे महालॅबकडून उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाला कळविण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. महालॅबमधील संबधित कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची सुचना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केली आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी उपजिल्हा रु ग्णालय प्रशासनाला दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक