सिन्नर तालुक्यातील वडांगळी, मनेगाव, वावी, बारागाव पिंप्री, मानोरी, ठाणगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सिन्नर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी आमदार कोकाटे बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, राजाराम मुरकुटे,नगरसेवक नामदेव लोंढे, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष विजय काटे, नानासाहेब खुळे, भाऊसाहेब सिरसाट, अशोक शिंदे, विस्ताराधिकारी प्रल्हाद बिब्बे आदी उपस्थित होते.
वडांगळी येथील योजनेच्या मुख्य तळ्यातील गाळ व खराब पाणी काढण्यासाठी व्यवस्था नसल्याने महिनाभरापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्या कामाच्या आउटलेटचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना करूनही त्या बाबत चालढकल होत असल्याने आमदार कोकाटे यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत आठ दिवसांच्या आत हे काम मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. तहसीलदारांनी खोपडी व पांगरी येथील पाईपलाईन कामातील अडथळे समृद्धीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून दूर करावे, बारागाव पिंप्री योजनेतील त्रुटी दूर करण्याच्याही सूचना संबंधितांना केल्या. योजनेतील पाईपलाईनची कामे तत्काळ पूर्ण करा, यावेळी योजनेच्या अध्यक्षांबरोबरच सरपंच योगेश घोटेकर, हेमंत भाबड,दगू चव्हाणके, अनुराधा गडाख, खोपडीचे दराडे, शरद गडाख, चंद्रभान रेवगडे विविध सरपंच व पाणीपुरवठा समिती सदस्य,सचिव यांनी आपली मते व गाऱ्हाणी मांडली.
चौकट
सौर उर्जेतून योजनांना देणार ऑक्सिजन..
योजनेच्या अध्यक्ष व सदस्यांनी वीजबिलाचा भार योजनांना असह्य झाल्याने त्यातून मार्ग काढण्याची विनंती आमदार माणिकराव कोकाटे यांना केली. वीजवितरणचे अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी तालुक्यातील सर्व योजनांची थकबाकी २ कोटी २५ लाख इतकी असून दरमहा योजनांना ५ लाख रुपये वीजबिल आकारणी केली जात असल्याचे सांगितले. यावर आमदार कोकाटे यांनी आपण तालुक्यातील सर्वच योजना सौर उर्जेवर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तालुक्यातील योजनांना जेवढी वीज लागते तेवढ्या क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पंचायत समितीच्या नावाने एखाद्या ग्रामपंचायतच्या जागेवर बसविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी जास्तीत जास्त निधी एकाच वेळी मिळविला जाईल. यामुळे योजनांची वीजबिलाच्या समस्येतून कायमस्वरूपी सुटका होईल. मागील थकबाकी वगळता तूर्त एप्रिलपासूनचे वीजबिल भरा व यापुढे ६ महिने वीजबिलाचा भार योजनांनी सोसावा, असे आवाहनही त्यांनी केले.
चौकट-
दरमहा पट्टी भरण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची
आमदार कोकाटे यांनी योजनानिहाय ६५ गावांतील ग्रामसेवकांवर दरमहा योजनेला द्यावयाच्या पट्टीची जबाबदारी निश्चित केली. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांकडून पट्टी वसूल करून ती संबंधित योजनेच्या खात्यात जमा करावी. वसुलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या व योजनेला असहकार्य करणाऱ्या ग्रामसेवकांचे पगार तत्काळ बंद करण्याच्याबरोबरच पट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींचे अनुदान रोखून ठेवा, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी केल्या. या बैठकीला दांडी मारणाऱ्या ग्रामसेवकांना नोटिसा काढण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
फोटो - १२ सिन्नर मिटिंग
सिन्नर येथे विविध पाणीपुरवठा योजनांच्या बैठकीत बोलतांना आमदार माणिकराव कोकाटे. समवेत कोंडाजी आव्हाड, राजाराम मुरकुटे, नामदेव लोंढे, राहुल कोताडे, मधुकर मुरकुटे, विठ्ठल उगले, विजय काटे, नानासाहेब खुळे, भाऊसाहेब सिरसाट,अशोक शिंदे आदि.
120921\12nsk_19_12092021_13.jpg
फोटो - १२ सिन्नर मिटींग