शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:06 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्दे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.

मालेगाव - खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या सावटाने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाच्या किमती स्थिर आहे, मात्र शेतीला लागणारा निविष्ठांचा किमती झपाट्याने वाढल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्याकरिता रासायनिक खतांवर सबसिडी दिली जाते. ही सबसिडी कोट्यवधीच्या घरात असली तरी दरवर्षी खतांचा किमती वाढतच असल्याने खर्चात वाढ होऊन नफा घटत आहे.

खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधीची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पाँस मशीनच्या प्रयोग राबविला गेला. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सबसिडी चोरीला आळा बसला, पण दुसरीकडे खतांचे भाव वाढविण्यात आले, असे शेतकरी सांगतात. शेतमालाचे दर जैसेथे तैसच आहे. इतकेच नव्हे तर काही धान्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. मात्र बियाणे, खत, मजुरी आणि विजेचा दरात वाढ होतच आहे. यामुळे शेतकऱ्याची कोंडी आणि व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांचा किमतीत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतीत होणारे नुकसान भरून काढता काढता नाकीनऊ आलेल्या शेतकरावर यंदाही अर्थिक भुर्दंड पडणार आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. एकरी एक ते दोन रासायनिक खतांच्या बँग शेतकरी वापरतात. साधारणत: एका बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.अशा वधारल्या खताच्या किंमती

खरीप हंगामापुर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०.२६.२६ या खंताची ५० किलोची बॅग १२३५ रूपायांपर्यत मिळायाची, ती आता १३४० रुपये किमतीत घ्यावी लागणार आहे. जवळपास १०५ रुपये अतिरिक्त शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत. डिएपीची बँग १२९० रुपयाऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रुपयाने भाव वाढले आहेत.  तर पोटॅशची बॅग ७०० रुपयावरुन थेट ९०० रुपये किमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMalegaonमालेगांव