शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

"नाशिक जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना तत्काळ नोकरीचे नियुक्ती आदेश द्या"

By अझहर शेख | Updated: May 8, 2023 19:34 IST

अनुकंपा पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी दुपारी झालेल्या बैठकीत भुसे यांनी आढावा घेतला.

नाशिक : जिल्ह्यात ‘झीरो पेंडेंसी’बाबत सूचना मागील बैठकीत देण्यात आल्या होत्या. यानुसार, जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय अस्थापनांमधील प्रलंबित अनुकंपाधारक पात्र उमेदवारांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३२९ पात्र उमेदवारांना नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

अनुकंपा पदभरती प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि. ८) दुपारी झालेल्या बैठकीत भुसे यांनी आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व विभागांचे नियुक्ती अधिकारी यावेळी उपस्थित होते.जिल्हास्तरावरील नियुक्ती अधिकाऱ्यांनी अनुकंपा पदभरतीमधील शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. अनुकंपा भरती प्रक्रियेत कृषी विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयातील ज्या तांत्रिक पदांची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे अनुकंपा उमेदवार उपलब्ध होत नाहीत, अशा विभागांनी संबधित अनुकंपा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याबाबत कळवावे व त्यांना त्याचे महत्त्व पटवून द्यावे, असेही भुसे म्हणाले.

तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद व महामंडळे यांच्या आस्थापनेवरील अनुकंपा पदभरतीबाबत संबंधित विभागांनी तत्काळ स्वतंत्र बैठक घेण्यात घेत, नियमांनुसार आवश्यक ते नियोजन करावे, असेही भुसे म्हणाले. जिल्ह्यातील ज्या विभागांची अनुकंपा भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या विभागांनी येत्या चार दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश भुसे यांनी दिले.

टॅग्स :Nashikनाशिक