शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करा : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 16:01 IST

लोहोणेर : - पावसामुळे द्राक्ष, कांदे, मकई बाजरी या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ ...

लोहोणेर : - पावसामुळे द्राक्ष, कांदे, मकई बाजरी या शेतमालाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे प्रशासकीय यंत्रणेला दिले. खोत यांनी शुक्रवारी ठेंगोडा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी बाळासाहेब रकीबे व दिनेश रकीबे यांच्या नुकसान झालेल्या ३० एकर द्राक्षेबागेची पाहणी केली. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा करत त्यावर प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी दिनेश रकिबे यांनी अर्ली द्राक्षाच्या पिकविमा कालावधी बाबत अडचण मांडली. झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडुन लवकरात लवकर मिळावी अशी मागणीही उपस्थित शेतकऱ्यांनी खोत यांचेकडे केली. यावेळी निवृत्ती रकीबे, सतिश देशमुख , दिलीप अिहरे , किरण मोरे, मोती चौधरी, सरंपच मधुकर व्यवहारे, वसंत शिंदे, गणेश देवरे, दादाजी मोरे, बाळु अहिरे, नितीन आहेर , सुरेश पाटील, दिलीप पाटील, प्रदीप शेवाळे, हिरामण आहेर, यांच्यासह प्रांत अधिकारी विजय भांगरे, बागलाणचे तहसिलदार जितेंद्र इंगळे ,कृषीअधिकारी एस.एस.पवार, गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे, पर्यवेक्षक चव्हाण ,तलाठी योगेश मेश्राम ,कृषी सहाय्यक पुष्पा गायकवाड,ग्रामविकास अधिकारी वाघ यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.------------------------आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, मकई, बाजरी आदी पिकांचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे लवकरात लवकर सर्व प्रशासनाने पुर्ण करून मदतीचा हात देणार !-सदाभाऊ खोत, कृषी राज्यमंत्री-----------------------------शासनाकडुन व पिकविमा कंपनीकडून त्वरित सर्वच नुकसानग्रस्त पिकांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी.-बाळासाहेब रकिबे , द्राक्ष उत्पादक शेतकरी, ठेंगोडा

टॅग्स :Nashikनाशिक