शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आयएमए : नाशिकमधील अडीच हजार डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 14:34 IST

आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे.

ठळक मुद्देआयएम कार्यालयाच्या आवारात निदर्शनेडॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकिय आयोग विधेयकाविरुध्द इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने (आयएमए)  राष्ट्रव्यापी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात नाशिक आयएमएनेही सहभाग घेतला असून शहरातील दोन हजार तर जिल्ह्यातील पाचशे असे एकूण अडीच हजार डॉक्टर आज काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहे.आधुनिक वैद्यकशास्त्राचे प्रतिनिधीत्व करणा-या आयएमएने या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविला आहे. खासगी वैद्यकिय महाविद्यालये सुरू करण्यासाठी असलेल्या सर्व अटी या विधेयक मंजूरीत रद्द होणार आहे. महाविद्यालयांचा मनमानी कारभार वाढून बोगस पदवीप्रदान डॉक्टरांची संख्या वाढणार, नियम भंग करणा-या डॉक्टरांना ५ कोटी ते १०० कोटी दंडाची तरतुद असल्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळेल, वैद्यकिय शिक्षण महागडे होऊन त्यावर धनदांडग्यांची मक्तेदारी होईल. केवळ पाच राज्ये प्रतिनिधीत्व असतील उर्वरित सर्व २९ राज्ये विन प्रतिनिधीत्व चालतील. सध्याची राज्य वैद्यकिय परिषदांची स्वायत्तता संपुष्टात येईल, विद्यापीठे नावापुरती उरतील. एकूणच हे विधेयक खासगी व्यवस्थापनाच्या सोईचे आहे. यामुळे आयएमए या विधेयकाला विरोध दर्शवित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.एकूणच आयएमएचे सर्व सभासद असलेल्या डॉक्टरांनी एकूण बारा तासांचा लाक्षणिक संप करत ‘काळा दिवस’ पाळला आहे. संध्याकाळी सहा वाजेपासून पुढे सर्व डॉक्टरांकडून नियमितपणे बाह्यरुग्ण तपासणीला सुरूवात होणार असल्याची माहिती आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ओपीडी बंदसकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत डॉक्टरांनी संप पुकारल्याने बाह्यरुग्ण तपासणी (ओपीडी) बंद आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत आहे. डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या रुग्णांची तपासणी बंद ठेवली आहे. यामुळे शहरातील रुग्णालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. बाहेरगावाहून शहरात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका बसला.

आयएम कार्यालयाच्या आवारात निदर्शनेआयएमच्या सदस्यांनी एकत्र येत येथील शालिमारच्या कार्यालयाच्या आवारात राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंपNashikनाशिकGovernmentसरकार