शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएमए’कडून सरकारचा धिक्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 00:17 IST

राष्टय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, हे विधेयक देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्यासंबंधित सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेकडून शनिवारी (दि.२८) एकदिवसीय राष्टÑव्यापी संप पुकारण्यात आला होता.

नाशिक : राष्टय वैद्यकीय आयोग विधेयक लोकसभेत मांडले जाणार असून, हे विधेयक देशातील वैद्यकीय क्षेत्र व त्यासंबंधित सर्व घटकांचे नुकसान करणारे असल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. या विधेयकाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी संघटनेकडून शनिवारी (दि.२८) एकदिवसीय राष्टÑव्यापी संप पुकारण्यात आला होता.  या संपात नाशिक शहरातील अडीच हजार व जिल्ह्यातील एक हजार असे एकूण साडेतीन हजार डॉक्टर सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला. शहरातील विविध दवाखाने, रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण तपासणी व कुठल्याही शस्त्रक्रिया शनिवारी न करून सरकारचा धिक्कार केला.राष्टÑीय वैद्यकीय आयोग विधेयकाविरुद्ध देशभरातील डॉक्टरांनी आयएमएच्या माध्यमातून शनिवारी रुग्ण सेवा बंद ठेवत सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत ‘धिक्कार दिन’ पाळला. शहरासह जिल्ह्यातील बाह्यरुग्ण तपासणी दिवसभर खासगी डॉक्टरांकडून बंद ठेवण्यात आली होती. शहरातील विविध डॉक्टरांच्या दवाखान्यांमध्ये ‘आज डॉक्टर संपावर’ असे सूचना फलक लावण्यात आले होते.दरम्यान, दुपारी शालिमार येथील आयएमएच्या कार्यालयात सर्व सभासद व संचालकांनी एकत्र येत बैठक घेतली. या बैठकित विधेयकाला कडाडून विरोध करण्यात आला. तसेच हे विधेयक सरकारने रेटून नेण्याचा प्रयत्न केल्यास आयएमएकडून देशपातळीवर आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी व खासदार हेमंत गोडसे यांनाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले. वैद्यकीय आयोग विधेयकाचे धोके त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. आवेश पलोड, सचिव डॉ. नितीन चिताळकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हेमंत सोननीस, डॉ. विशाल गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.एक हजार दवाखान्यांत ‘नो-ओपीडी’राष्टय वैद्यकीय विधेयक श्रीमंती पोसणारे असून, गरिबीवर यामुळे संकट येणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शहरात अ‍ॅलोपॅथीद्वारे उपचार करणारे सुमारे पाचशे रुग्णालये आहेत. तसेच दवाखान्यांची संख्या एक हजारांवर आहे. शहरातील या सर्व रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये दिवसभर कुठल्याहीप्रकारे बाह्यरुग्णांची तपासणी व औषधोपचार करण्यात आला नाही. आणीबाणीच्या परिस्थितीत प्रचंड गंभीर अवस्थेतील रुग्णांवर डॉक्टरांकडून औषधोपचार व तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर