शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

‘विहिंप’ची पाटी वाहनावर बेकायदेशीर

By admin | Updated: July 8, 2017 01:23 IST

नाशिक : गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मालेगाव येथील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री तथा गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ अशी पाटी बेकायदेशीर असून, त्यांनी प्राणी संरक्षण कायद्यान्वये केलेली कृतीदेखील कायदेशीर नसल्याचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आले असून, शिर्के यांच्याविरुद्ध बेकायदेशीर पाटी लावल्याबद्दल छावणी पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. मालेगावातील संगमेश्वर भागात मच्छिंद्र शिर्के यांच्यावर हल्ला केल्याच्या कारणावरून छावणी पोलीस ठाण्यात तन्वीरखान खलीलखान यांच्यासह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्पूर्वी १४ फेब्रुवारी २०१७ रोजी मालेगाव येथे काही व्यक्ती गायींची वाहतूक करीत असल्याच्या संशयावरून गोवंश संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गोवंश संरक्षण समितीचे सुभाष मालू, मच्छिंद्र शिर्के आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून शिर्के यांच्यावर हल्ला करण्यात आल्याच्या या घटनेने मालेगावातील वातावरण तप्त झाले होते. शिर्के यांना मारहाण करणारा प्रमुख संशयित तन्वीरखान याचा मालेगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यावर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने १२ जूनपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता; मात्र हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने शिर्के यांच्या वाहनावर लावलेली ‘जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद’ ही पाटी कायदेशीर आहे किंवा कसे याबाबत सरकारने शहानिशा करावी तसेच पाटी लावणे बेकायदेशीर असेल तर पोलिसांनी त्यावर काय कार्यवाही केली याचा खुलासा करावा, अशी सूचना सरकारला केली होती.