शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-गुजरात सीमेवर अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:12 IST

जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघ तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे व मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्णाच्या सीमांवर गस्त कडक केली असून, शुक्रवारी मध्यरात्री लावलेल्या सापळ्यात गुजरात सीमेवरून नाशिक जिल्ह्णात बेकायदा मद्यसाठा घेऊन येणारे दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नाशिक : जिल्ह्यात विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघ तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता जारी असल्याने मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे व मद्याची होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक जिल्ह्णाच्या सीमांवर गस्त कडक केली असून, शुक्रवारी मध्यरात्री लावलेल्या सापळ्यात गुजरात सीमेवरून नाशिक जिल्ह्णात बेकायदा मद्यसाठा घेऊन येणारे दोन वाहने जप्त करण्यात आली आहेत.  नाशिक जिल्ह्णात प्रामुख्याने दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्र शासित प्रदेश निर्मित मद्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे वेळोवेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत निदर्शनास आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातही याच भागातून मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक केली जाण्याची शक्यता गृहीत धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक-गुजरात सीमेवरील गावांमध्ये सापळा रचला होता. त्या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी हरसूल परिसरातील जंगलात सापळा रचला होता.  मध्यरात्री मारुती सुझुकी कंपनीची अल्टोकार ही बेलपाली गावाकडून हरसूल गावाकडे येत असताना अधिकाºयांनी ती अडवून तपासणी केली असता त्यात केवळ दादरा नगरहवेली या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या मॅकडॉवेल व्हिस्कीच्या ९६ बाटल्या तसेच किंगफिशर स्ट्रॉँग बिअरच्या २५२ बाटल्या सापडल्या. त्यानंतर पुन्हा या पथकाने आपला सापळा ठाणेपाडा-हरसूल रस्त्यावर सापळा रचला असता शनिवारी पहाटे ५ वाजता महिंद्रा बोलेरो जीप हरसूल गावाकडे येत असताना तिची तपासणी केली असता त्यामध्येही केवळ दादरा नगर हवेली या ठिकाणी विक्रीची परवानगी असलेल्या किंगफिशर कंपनीच्या बिअरच्या १२० बाटल्या मिलून आल्या.  सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत व उपअधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक प्रवीण मंडलिक, दुय्यम निरीक्षक माधव तेलंगे, मनोहर गरुड, जवान विरेंद्र वाघ, विलास कुवर, दीपक आव्हाड, संतोष कडलग आदींनी पार पाडली.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभाग