शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्समध्ये बेकायदा बिअरबार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:29 IST

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदूर, मानूर, आडगाव, औरंगाबादरोड परिसरात असलेल्या अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम मद्यविक्री केली जात असल्याने हॉटेल्स व ढाब्यांवर दैनंदिन रात्रीच्या सुमाराला मद्यपींची शाळा भरू लागली आहे.

पंचवटी : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नांदूर, मानूर, आडगाव, औरंगाबादरोड परिसरात असलेल्या अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर गेल्या काही महिन्यांपासून खुलेआम मद्यविक्री केली जात असल्याने हॉटेल्स व ढाब्यांवर दैनंदिन रात्रीच्या सुमाराला मद्यपींची शाळा भरू लागली आहे. विशेष म्हणजे अनधिकृतपणे मद्यविक्री करणाऱ्या हॉटेल्स तसेच ढाबेचालक यांच्यावर कारवाईचे धाडस केले जात नसल्याचे उघडपणे बोलले जात आहे. आडगाव पोलिसांची कारवाई शून्य असल्याने हॉटेल्स तसेच ढाब्यांनादेखील खुल्या बिअरबारचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आडगाव शिवारात अनेक हॉटेल्स तसेच ढाबे असून, रात्री उशिरापर्यंत ते सुरू राहतात. यातील अनेक हॉटेल्स तसेच ढाब्यांवर देशी व विदेशी मद्य परवानगी नसतानादेखील विक्री केले जाते.गेल्या अनेक महिन्यांपासून विनापरवाना मद्यविक्री केली जात असल्याने शेकडो मद्यपी मध्यरात्रीपर्यंत बसलेले असतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या खुल्या बिअरबार विरुद्ध आडगाव पोलीस कारवाई करणार का? की खुद्द पोलीस आयुक्तांना याबाबत दखल घ्यावी लागणार, अशी चर्चा नागरिक करू लागले आहेत.‘अर्थपूर्ण’ संबंधआडगाव शिवारात असलेल्या हॉटेल्स तसेच ढाब्यांवर खुलेआमपणे मद्यविक्री केली जाते. विशेष म्हणजे ढाबेचालक आणि आडगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी विशेषत: ‘वसुली’ अधिकाºयांचे अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्याने हॉटेल तसेच ढाब्यांवर मद्यविक्री तसेच मद्यपींना मद्यप्राशन करून देण्यासाठी बसू दिले जाते, असे काही हॉटेल्स व ढाबेचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक