सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रि या पार पडली असून, सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात उद्योग विकास पॅनलच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा समावेश आहे, तर एका उमेदवाराने छाननीच्या दिवशीच माघारी घेतली आहे, तरीही ४१ जागांसाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल आहेत.जिल्ह्यातील अग्रणी समजल्या जाणाऱ्या निमा या औद्योगिक संघटनेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी एकता आणि उद्योग विकास पॅनलच्या उमेदवारांनी ४१ जागांसाठी १३१ अर्ज दाखल केले होते. रविवारी निवडणूक यंत्रणेकडून उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. दरम्यान, दि.२२ जुलै उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दि.२९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. के. भुतानी, सहायक विवेक गोगटे, एन. टी. अहिरे काम पाहत आहेत. सत्ताधारी एकता पॅनलच्या विरोधात उद्योग विकास पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहे. उमेदवारी अर्ज छाननीत उद्योग विकास पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार महेंद्रकुमार वाणी आणि सरचिटणीस पदाचे उमेदवार कैलास अहेर आणि मोठ्या उद्योग गटातील उपाध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश नायर यांचे अर्ज अवैध ठरविल्याने पॅनलला मोठा धक्का बसला आहे.
उद्योग पॅनल अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सहा अर्ज अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:11 IST
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रि या पार पडली असून, सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात उद्योग विकास पॅनलच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा समावेश आहे, तर एका उमेदवाराने छाननीच्या दिवशीच माघारी घेतली आहे, तरीही ४१ जागांसाठी १२४ उमेदवारी अर्ज दाखल आहेत.
उद्योग पॅनल अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सहा अर्ज अवैध
ठळक मुद्दे निमा निवडणुकीत एका उमेदवाराची माघार