शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांकडे डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:49 IST

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.

ठळक मुद्देकिसन गुजर : किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांचा विजयी मेळावा भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन

दिंडोरी : राज्य सरकारने किसान सभेला दिलेले आश्वासन पाळले नाही तर येत्या सहा महिन्यांत विधानभवनाला घेराव घालण्यात येईल, असा खणखणीत इशारा राज्य किसान सभेचे अध्यक्ष किसन गुजर तसेच आमदार जे. पी. गावित यांनी दिला.दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किसान सभेच्या वतीने आयोजित लॉँग मार्च विजयी मेळाव्याप्रसंगी आमदार जे. पी. गावित अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकºयांचे कर्जमाफी व वनजमिनीचे प्रश्न प्रलंबित असल्याने किसान सभेच्या वतीने लाखोच्या संख्येने नाशिक ते विधानभवन लॉँग मार्च काढण्यात आला. शेतकºयांच्या समस्यांकडे राज्य सरकारने जाणून-बुजून डोळेझाक केली असून, वनजमिनीचे प्रश्न हाताळण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. येत्या सहा महिन्यांत शेतकºयांचे प्रश्न मार्गी न लावल्यास किसान सभेच्या वतीने विधानभवनाला घेराव घालण्यात येईल व लेखी स्वरूपात आदेश सरकारने दिले तर आंदोलन मागे घेण्यात येईल. अन्यथा होणाºया परिणामास शासन जबाबदार राहील, असा इशारा किसान सभेच्या वतीने आमदार जे. पी. गावित यांनी दिला. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, जिल्हा सरचिटणीस सुनील मालुसरे, अ‍ॅड. दत्तू पाडवी, सुरगाणा पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगोडे, तालुका अध्यक्ष देवीदास वाघ, सेक्रेटरी रमेश चौधरी, भारिप जिल्हा सचिव सम्राट पगारे, सदस्य भीमराव गांगुर्डे, प्रमोद निकम, गणेश शार्दूल आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाल, निळे झेंडे घेऊन मिरवणूकयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिंडोरी शहरातून भारिपसह आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत शक्तिप्रदर्शन करीत लाल व निळे झेंडे घेऊन मिरवणुकीद्वारे बाजार पटांगण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.