शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

इगतपुरीमधील संधींचा लाभ घ्या, 'सर्वप्रथम डेव्हलपर'ने मोक्याच्या जागेला दिले महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 12:57 IST

मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या सर्वप्रथमच्या प्रोजेक्टपासून इगतपुरी, नाशिक, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर ही ४ लोकप्रिय पर्यटनस्थळे जवळ आहेत.

मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या सर्वप्रथमच्या प्रोजेक्टपासून इगतपुरी, नाशिक, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर ही ४ लोकप्रिय पर्यटनस्थळे जवळ आहेत. हे प्रकल्प मुंबई व नाशिकदरम्यान असलेल्या  इगतपुरीमधील गोंदेदुमाला या भरभराटीला येऊ घातलेल्या कमर्शिअल हबवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या ठिकाणी आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे हा भाग मध्य रेल्वे मार्गाला जोडलेला आहे आणि मुंबईची लोकल ट्रेन सेवा कसाऱ्यावरून या प्रकल्पाजवळ असलेल्या पाडली स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची योजना आहे. लवकरच खुला होत घातलेल्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून हा प्रकल्प मुंबई व उत्तर महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे. ठाणे-भिवंडी कनेक्टरचे रुंदीकरण सुरू आहे आणि मुंबईतील पश्चिम उपनगरातील रहिवासी बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाच्या माध्यमातून जोडले जातील. या सर्व पायाभूत सुविधा उपक्रमांमुळे प्रवासाचा वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

उत्तम जोडणीव्यतिरिक्त, या परिसरात सॅमसोनाइट, थायसेनक्रप, पार्ले आणि जिंदालसारख्या १०० हून अधिक बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्या आहेत. परिणामी, उत्तम वेतन असणारे प्रोफेशनल या भागात येऊन राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मिळणारे भाडेही अधिक आहे आणि ऑक्युपन्सी दर सुमारे १०० टक्के आहे.

पायाभूत सुविधा हाकेच्या अंतरावरसुविधाजनक राहणीमान आणि गुंतवणूकसुलभता यावर कंपनीने भर दिलेला आहे. त्यांच्या प्रकल्पांमध्ये सर्व आवश्यक पायाभूत सुविधा हाकेच्या अंतरावर असतात. बाजारपेठा, दुकाने, बँका, एटीएम, वैद्यकीय सुविधा, खानपानगृहे, हॉटेल्स आणि फॅक्टरी आउटलेट्सही या परिसरात असून त्यामुळे प्रत्येक गरज भागवली जाते. त्याचप्रमाणे सर्वप्रथमतर्फे रेंटल असिस्टन्स, इन-हाउस देखभाल सुविधा, प्रॉपर्टी अपग्रेडशी संबंधित सहाय्य आणि रिसेलसाठीही मदत करण्यात येते. मुंबई, नाशिक आणि इगतपुरीला या कंपनीची कार्यालये असून ग्राहकांना त्यांच्या सोयीसाठी प्राथमिक निवासाच्या जागेच्या जवळ असलेल्या कार्यालयातून सेवा प्रदान करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

"मोक्याचे ठिकाण, उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता, गुंतवणूकवृद्धी या सगळ्या घटकांसंदर्भात मी विविध प्रॉपर्टींचा अभ्यास केला. या ठिकाणी या तीनही घटकांची सांगड घातलेली मला दिसून आली आणि त्यानंतरच मी येथे गुंतवणूक केली. माझ्या कुटुंबासाठी घेतलेला हा एक उत्तम निर्णय आहे. सातत्याने भाववाढ होत जाणाऱ्या मालमत्तेत गुंतवणूक करून मी मुलांचे भविष्य सुरक्षित केले आहे, त्याचप्रमाणे या प्रॉपर्टीच्या भाड्यातून मी ईएमआय भरत आहे. मी जेव्हा गुंतवणूक केली होती तेव्हाच्या भाड्यात आता दुपटीने वाढ झाली आहे," अशी प्रतिक्रिया मुंबईतील गुंतवणूकदार महेश दोंदे यांनी दिली.

वाजवी दरात सुविधाजे ग्राहक आपल्या सेकंड होमसाठी या ठिकाणाची निवड करत आहेत, त्यांना सर्वप्रथमचे प्रोजेक्ट वाजवी मेटनेनन्स खर्चात सर्व आवश्यक गरजा पुरवतात. हे ठिकाणी मुकाणे धरणाजवळ आहे. त्याचप्रमाणे तलावाला लागून असलेले अनेक पिकनिक स्पॉट्स, हायकिंग ट्रेल्स, व्हॅलोन विनयार्ड्ससारखी प्रसिद्ध विनयार्ड्स, लीझर डायनिंग पर्याय, वाबी साबी रिसॉर्ट्स ही ठिकाणेही या प्रकल्पांपासून जवळ आहेत. सर्वप्रथम डेव्हलपरचे 'पाम हिल्स व्हिलाज' व 'आनंदवन अपार्टमेंट्स' हे प्रकल्प सध्या सुरू आहेत आणि हायवे प्लाझा शॉपिंग कॉम्प्लेक्स हा आगामी प्रकल्प आहे. सर्वप्रथमने अलीकडेच ३५० पेक्षा अधिक आनंदी कुटुंबांचा एक सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी ब्रँड ॲम्बेसेडर किशोरी शहाणे आणि 'सर्वप्रथम परिवारा'चे सदस्य उपस्थित होते.सर्वप्रथमची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली. जमीन एकत्रीकरण (लँड कन्सॉलिडेशन) करणे हा सर्वप्रथमचा मूळ व्यवसाय होता. आता इगतपुरी, नाशिक भागात ते आघाडीचे बिल्डर व लँड डेव्हलपर ब्रँड आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.