शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

इगतपुरी तालुक्यात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 17:06 IST

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील भरवीर खुर्द शिवारात १३ शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने नेहमीच बंदोबस्त व्हावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.

घोटी : गेल्या आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील भरवीर खुर्द शिवारात १३ शेळ्यांचा फडशा पाडणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याने नेहमीच बंदोबस्त व्हावा, ही अपेक्षा व्यक्त होत आहे.इगतपुरी तालुक्यातील भरवीर खुर्द येथील शिंदे मळा (टेंभाडी) भागात गत मंगळवारी रात्रीच्या सुमारास बाळू किसन शिंदे यांच्या घराजवळील शेळी शेडमधून बिबट्याने १३ शेळ्या फस्त केल्या होत्या. १३ शेळ्यांपैकी ८ शेळ्या मृतावस्थेत सापडल्या होत्या. ५ शेळ्या अद्यापही गायब आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. याआधीही या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याने दहशत माजवलेली असून भरवीर खुर्द आणि परिसरात भीतीचे सावट पसरलेले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात आली होती.दरम्यान, बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून वनविभागाने गस्त सुरू ठेवली होती. सात दिवसांनी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या मादी असून, वय अंदाजे तीन वर्षे असावे, असे नमूद केले. इगतपुरी वन परिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील, परिमंडळ अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक संतोष बोडके, एफ. ए. सय्यद आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक