शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

इगतपुरी : सूक्ष्म नियोजन अन् कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा परिणाम विजयाची परंपरा राखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:20 IST

प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे शिवसेनेने इगतपुरी नगरपालिकेवर भगवा फडकवत विजयाची परंपरा कायम राखली.

ठळक मुद्देभाजपा आणि कॉँग्रेसला मतदारांनी सपशेल नाकारलेविरोधकांना धूळ चारली विरोधी गटाला मोठे खिंडार

इगतपुरी : प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे शिवसेनेने इगतपुरी नगरपालिकेवर भगवा फडकवत विजयाची परंपरा कायम राखली. विरोधकांचे मनसुबे उधळण्यात शिवसेनेला यश मिळाले असून, भाजपा आणि कॉँग्रेसला मतदारांनी सपशेल नाकारले. रिपाइंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले.गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचे झेंडा फडकविणारे टीम शिवसेना इगतपुरीचे कप्तान नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय इंदूलकर यांनी एकहाती सत्ता घेत विरोधकांना धूळ चारली. शिवसेनेचे १३, तर भाजपाचे ४ व अपक्ष १ नगरसेवक निवडून आले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर विरोधी गटातील रा. काँ.चे नगरसेवक युवराज भोंडवे, उज्ज्वला जगदाळे, नरेंद्र कुमरे, रा.काँ.च्या शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या पत्नी सीमा जाधव, वसीम सय्यद, नवल सोनार यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करवून घेतला होता. त्यामुळे विरोधी गटाला मोठे खिंडार पडले होते. नेहमी शिवसेनेच्या विरोधात असणाºया प्रभागातील उमेदवार, पदाधिकारी सेनेत गेल्यामुळे मोठे मताधिक्य सेनेला या भागातून मिळाले. शिवसेना आणि इंदूलकर यांचे गेल्या २५ वर्षांपासून संबंध आहे. इंदूलकर यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर कधीच स्वत:चे कौतुक करवून घेतले नाही किंवा इतर पदांसाठी हापापलेपणा केला नाही. ते जिल्हा आणि राज्य नेत्यांना एकच सांगतात मी आणि फक्त माझी इगतपुरी. त्यामुळे जिल्हा व राज्यावरून अनेक नेत्यांनी मदतीसाठी ठाण मांडले. आदेश बांदेकर यांच्या रोड शोला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या रॅलीमुळे सेनेच्या बाजूने वातावरण तयार झाले होते. शिवसेनेची इगतपुरी शहरात मोठी ताकद आहे. हक्काचे मतदार शिवसेनेकडे आहेत हे लक्षात घेता भाजपा, पुरोगामी विकास आघाडी, काँग्रेस, भारिप यांनी सेनेसमोर एकत्र येत एकच उमेदवार दिला असता तर चित्र उलट झाले असते; मात्र मोठ्या प्रमाणावर मतविभाजन झाल्याने सेनेला विजयावर शिक्कामोर्तब करता आले. गेल्या निवडणुकीत पर्यटन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष नईमखान यांनी सेनेशी युती केली होती. शिवसेनेने ११ तर पर्यटन विकास आघाडीने आठ जागा लढविल्या होत्या; मात्र गेल्या वेळेस आठही जागांवर पराभव पत्करावा लागला होता. यावेळी नईम खान यांनी शिवसेनेच्या चिन्हावर लढत विजय संपादन केला. खान यांनी इतर प्रभागातही प्रचारात सक्रिय सहभाग घेत उमेदवारांना निवडून आणले.भाजपाचे नियोजन कोलमडलेइगतपुरीत भाजपाची सत्ता आणायचीच हे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप यांनी चंग बांधत मोठे नियोजन केले होते. जवळपास ३०-३५ नगरसेवक शहरात डेरेदाखल होते; मात्र शहरातील बºयाच भागांची त्यांना कल्पना नव्हती. फक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार फिरोज पठाण यांच्यासह जवळचे काही पदाधिकारी नियोजन करत होते. सूक्ष्म नियोजन नसल्याने शहरात बांधणी करता आली नाही. सुरुवातीपासून भाजपाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण, हे ठरविण्यात वेळ घालविला. त्यात आयात निर्यात उमेदवार वाद प्रकरण राज्यात गेले. त्यात कोणी किती मदत केली हे सत्तेच्या गणितावरून लक्षात येत आहे.