शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:32 IST

इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरीनाशिक : वडिलांच्या सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करण्यासाठी मागितलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ ...

ठळक मुद्देयुवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरीइगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी

इगतपुरीतील घटना : सेवानिवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पैशांची मागणी युवक खून प्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी

नाशिक : वडिलांच्या सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करण्यासाठी मागितलेल्या दोन लाख रुपयांचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास मारहाण करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी पुनाजी वाळू मेंगाळ (५५, राख़ेड, ता़इगतपुरी, जि़नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी सोमवारी (दि़४) पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ ३ जून २०१४ रोजी ही घटना घडली होती़इगतपुरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मुरलीधर धोंडू आगविले व आरोपी पुनाजी मेंगाळ हे कामास आहेत़ मेंगाळ याने आगविले यांच्याकडे सेवानिवृत्तीनंतरची पेन्शनची कागदपत्रे तयार करण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची मागणी केली होती़ आगविले यांनी ही बाब मुलगा राजू यास सांगितली असता ३ जून २०१४ रोजी तो मेंगाळ यांच्याकडे गेला. कशाबद्दल पैसे द्यायचे असा जाब विचारू लागला़ यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या मेंगाळ याने राजूच्या गुप्तांगावर लाथ मारल्याने राजूचा मृत्यू झाला़ याप्रकरणी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील संजय पाटील व गायत्री पटनाला यांनी साक्षीदार तपासले, तर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश वारे यांची साक्ष महत्त्वाचीठरली़घटनेच्या वेळी आरोपी मेंगाळ हा मद्याच्या नशेत असला तरी कोणत्या ठिकाणी लाथ मारल्यानंतर जीव जाऊ शकतो याचे त्याला ज्ञान होते, असे निरीक्षण न्यायाधीश मोरे यांच्या सरकारी वकिलांनी लक्षात आणून दिले़ त्यामुळे आरोपीस मेंगाळ यास पाच वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़