इगतपुरी : शहरातील शिवसेना पुरस्कृत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य हळदी कुंकू चा कार्यक्र म मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी भजन, किर्तनासह विविध स्पर्धा घेत उत्साहात उपक्रम राबविला.इगतपुरी येथील अण्णाभाऊ साठे वाचनालयात नगराध्यक्ष संजय इंदुलकर व सामाजिक कार्यकर्त्या सिमा इंदुलकर यांच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्र मास शिवसेना महिला आघाडीच्या नाशिक जिल्हा संघटक मंदा दातीर, नगरसेवक उज्वला जगदाळे, सीमा जाधव, आरती कर्पे, रोशनी परदेशी, आशा सोनवणे, शहर प्रमुख जयश्री जाधव तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रास्ताविकात महिला आघाडी तालुका प्रमुख अलका चौधरी यांनी इगतपुरी शहरात शिवसेना महिला आघाडी राबवित असलेल्या उपक्र मांची माहिती दिली. त्यानंतर मंदा दातीर आदींनी मनोगत व्यक्त केले.हळदी कुंकू समारंभात घोटी येथील महिला भजनी मंडळांनी विविध भजने सादर केली. तसेच महिलांनी उखाणे, फेर धरून नृत्य, नाटिका यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. या वेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
इगतपुरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 22:19 IST
इगतपुरी : शहरातील शिवसेना पुरस्कृत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने भव्य हळदी कुंकू चा कार्यक्र म मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांनी भजन, किर्तनासह विविध स्पर्धा घेत उत्साहात उपक्रम राबविला.
इगतपुरीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकू
ठळक मुद्दे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.