शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी : ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:16 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाइन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. मतमोजणी २५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून, इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्दे२४ मार्चला मतदान : ५ मार्चपासून उमेदवारी दाखल करता येणार

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाइन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. मतमोजणी २५ मार्च रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून, इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे.इगतपुरी तालुक्यातील वाकी, मुरंबी, देवळे, इंदोरे, रायांबे, उभाडे, मालुंजे, धामणी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्णोली, सोनोशी, समनेरे, बोरटेंभे, कावनई, खैरगाव, खडकेद, नांदूरवैद्य, अधरवड, शेवगेडांग, बारशिंगवे, कोरपगाव, मांजरगाव, कांचनगाव, बेलगाव कुºहे, शेणवड बुद्रुक, पिंपळगाव मोर, पाडळी देशमुख, मायदरा धानोशी, पिंपळगाव भटाटा या ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आॅनलाइन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी दि. ५ ते ११ मार्च मुदत देण्यात आली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च रोजी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी १३ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हवाटप केले जाईल. अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी १३ मार्च रोजी होणार आहे. दि. २४ मार्च रोजी सकाळी ७. ३० ते ५. ३० दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी २५ मार्चला होईल.दरम्यान ३० ग्रामपंचायतींमध्ये तुल्यबळ लढती होणार असून, यंदा प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत असल्याने चुरस पाहायला मिळेल. इच्छुकांची धावपळ उडाली असून, आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. निवडणूक यंत्रणाही सक्रियतेने नियोजन करीत आहे. ३० गावांसाठी निवडणूक घेण्यासाठी आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. निवडणुकीशी संबंधितांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. निष्पक्ष, निर्भीड वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आम्ही सक्रि य आहोत.- वंदना खरमाळे, तहसीलदार, इगतपुरी