शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:53 IST

महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे.

नाशिक : महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे. अर्थात, आजारपणाची रजा घेतल्यानंतर ज्याप्रमाणे रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश हे प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्याचे लेखीपत्र दिल्याचे सांगण्यात आले.नाशिक महापालिकेत कामाचा अतिताण असल्याचे सांगण्यात येत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मार्च महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५च्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी पहाटे या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून पाटील घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी त्यांची मोटार तेथेच आढळल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबीयांनी मोटार तपासली असताना त्यात पाटील यांनी आपण कामाच्या अति ताणामुळे जात असल्याचे नमूद केले होते, व जिवाचे बरे वाईट करणार असल्याचेही त्यात नमूद असल्याने शहरात खळबळ उडाली होती.आठ दिवस पाटील हे बेपत्ता असल्याने अनेक शंका व कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच ते पुणे येथे असल्याचे पोलिसांना कळाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचवले. दरम्यान, पाटील यांनी महापालिकेत तत्काळ रुजू न होता आपले मनस्वास्थ ठीक नसल्याने रुजू होत नसल्याचे कारण दिले, त्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत रजा घेतली होती.प्रमाणपत्रानंतरच करून घेणार रूजू रवि पाटील आता रुजू होण्यास उत्सुक असून, त्या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर दिले असून, त्यांना मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका