नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहे. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.नाशिकजवळील मोहाडी (दिंडोरी) येथे सह्याद्री फॉर्मवर शेतकºयांसमवेत केंद्रीय कृषी सचिव यांचा संवाद कार्यक्रम शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. साधारणत: सहा ते सात वर्षांपूर्वी कृषिमंत्र्यांनी देशात व देशाबाहेर हॉर्टिकल्चर शेतीसाठी काही नवीन योजना सुरू केल्या होत्या. नाशिकची ओळख आता फळे आणि फुलांसाठी होऊ लागली आहे. सह्याद्री फॉर्मसारखे राज्यात किमान एक हजारावर फॉर्म शेतकºयांनी एकत्रित येत उभे केले आहेत. त्या फॉर्मला केंद्रीय कृषी विभागामार्फत काही अनुदान व योजना लागू करण्याबाबत आपण शेतकरी आणि केंद्रीय कृषी विभाग यांच्यात मध्यस्थी केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. फुले आणि फळांच्या योजनांशी निगडित ८० टक्के प्रश्न हे अर्थ विभागाशी तर २० टक्के प्रश्न हे कृषी विभागाशी निगडित असल्याचे या चर्चासत्रातून समोर आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात आपण अर्थ विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना नाशिकला येण्याबाबत विनंती करणार आहोत. आपण केलेल्या ७१ हजार कोेटींच्या कर्जमाफीबाबत त्यावेळी एकही तक्रार नव्हती. आताच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत प्रचंड गोंधळ आहे. काही शेतकºयांना तीस तीस रुपये कर्जमाफी दिली आहे. ही शेतकºयांची एकप्रकारे टिंगलटवाळी सुरू आहे. पीक विम्याच्या कर्जमाफीबरोबरच दीर्घ मुदतीचेही कर्ज माफ होणे गरजेचे आहे. मात्र सरकार त्यात फारसे गंभीर दिसत नाही. २५ नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भात सरकारने निर्णय जाहीर करण्याचे सांगितले आहे. मात्र २५ नोेव्हेंबरपर्यंत या दीर्घ मुदतीच्या कर्जमाफीबाबत निर्णय न झाल्यास त्याविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोेलन करणार आहे. हल्ली शेतकरी आणि शेतीविषयक कोणतेही आंदोलन झाल्यास मुख्यमंत्री राष्टÑवादी कॉँग्रेसला दोष देतात. ठीक आहे यापुढे शेतकºयांसाठी राष्ट्रवादीच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 16:17 IST
नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहे. पीक कर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी ...
दीर्घ मुदतीचे कर्ज माफ न केल्यास रस्त्यावर उतरू : शरद पवार
ठळक मुद्दे सामूहिक शेती अनुदानासाठी अर्थमंत्र्यांना भेटणार : गुजरात लढवू