शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

दीर्घ मुदतीचे कर्ज माफ  न केल्यास रस्त्यावर उतरू :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:26 IST

शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीककर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देकर्जमाफी अत्यंत फसवी शेतकºयांसमवेत केंद्रीय कृषी सचिव यांचा संवाद काही शेतकºयांना तीस तीस रुपये कर्जमाफी

नाशिक : शासनाने दिलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना अडथळ्यांच्या शर्यती पार कराव्या लागत आहेत. पीककर्जासोबतच दीर्घ मुदतीच्या शेती कर्जाला २५ नोेव्हेंबरपर्यंत कर्जमाफी न दिल्यास राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती माजी केंद्रीयमंत्री व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  नाशिकजवळील मोहाडी (दिंडोरी) येथे सह्याद्री फार्मवर शेतकºयांसमवेत केंद्रीय कृषी सचिव यांचा संवाद कार्यक्रम शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. साधारणत: सहा ते सात वर्षांपूर्वी कृषिमंत्र्यांनी देशात व देशाबाहेर हॉर्टिकल्चर शेतीसाठी काही नवीन योजना सुरू केल्या होत्या. नाशिकची ओळख आता फळे आणि फुलांसाठी होऊ लागली आहे. सह्याद्री फार्मसारखे राज्यात किमान एक हजारावर फार्म शेतकºयांनी एकत्रित येत उभे केले आहेत. त्या फार्मला केंद्रीय कृषी विभागामार्फत काही अनुदान व योजना लागू करण्याबाबत आपण शेतकरी आणि केंद्रीय कृषी विभाग यांच्यात मध्यस्थी केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. फुले आणि फळांच्या योजनांशी निगडित ८० टक्के प्रश्न हे अर्थ विभागाशी तर २० टक्के प्रश्न हे कृषी विभागाशी निगडित असल्याचे या चर्चासत्रातून समोर आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळे यापुढील काळात आपण अर्थ विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना नाशिकला येण्याबाबत विनंती करणार आहोत. आपण केलेल्या ७१ हजार कोेटींच्या कर्जमाफीबाबत त्यावेळी एकही तक्रार नव्हती. आताच्या सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत प्रचंड गोंधळ आहे. काही शेतकºयांना तीस तीस रुपये कर्जमाफी दिली आहे. ही शेतकºयांची एकप्रकारे टिंगलटवाळी सुरू आहे. पीक विम्याच्या कर्जमाफीबरोबरच दीर्घ मुदतीचेही कर्ज माफ होणे गरजेचे आहे. मात्र सरकार त्यात फारसे गंभीर दिसत नाही. २५ नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भात सरकारने निर्णय जाहीर करण्याचे सांगितले आहे. मात्र २५ नोेव्हेंबरपर्यंत या दीर्घ मुदतीच्या कर्जमाफीबाबत निर्णय न झाल्यास त्याविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोेलन करणार आहे. हल्ली शेतकरी आणि शेतीविषयक कोणतेही आंदोलन झाल्यास मुख्यमंत्री राष्टÑवादी कॉँग्रेसला दोष देतात. शेतकºयांसाठी राष्ट्रवादीच तारक आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही शरद पवार यांनी सांगितले.  यावेळी माजी मंत्री विनायक पाटील, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार दिलीप बनकर, राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, श्रीराम शेटे आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरेंनी केली विनंतीउद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली, हे खरे आहे. मात्र त्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. शिवाजी पार्कवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे, ही आपणच सूचना केली होती. त्यानुसार हे स्मारक तेथे होण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांना आपण मदत करण्याचे आश्वासन दिले. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार हे आपण रोजच त्यांच्या मुखपत्रातून वाचतो. असे म्हणत ते दोेन वर्षे सरकारमध्येच काढतील, अशी कोपरखळी त्यांनी शिवसेनेला मारली.गुजरात लढविणारमागील वेळी गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही दोन जागा लढविल्या आणि दोन्ही जागा जिंकल्या. आताही गुजरात विधानसभा निवडणुकीत मागील वेळेच्या दोन जागांसह अन्य कोणत्या जागा लढवायच्या याबाबत माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल गुजरातमध्ये जाऊन माहिती घेत आहेत. कॉँग्रेससोबत युती करून आम्ही जागा लढवू, असे खासदार शरद पवार यांनी सांगितले. जीएसटीने शेतीला फटका जीएसटी करामुळे सर्वाधिक फटका हा शेती क्षेत्राला बसला आहे. शेतीसंदर्भातील अनेक वस्तू व साहित्य जीएसटीमुळे महाग झाले आहे. अगदी प्लॅन करून त्यांनी जीएसटीमध्ये वस्तू महाग केल्या. नंतर बोंबाबोंब होईल, हे पाहून मग आता ते दर उतरवत असल्याचा आरोप खासदार शरद पवार यांनी केला. आता काल परवा स्वस्त केलेल्या वस्तूंमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू दिसत नाहीत.  यात केवळ चॉकलेट आणि मेकअपचे सामान स्वस्त झाल्याचे मात्र दिसते. गुजरातच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या वस्तू स्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार