शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाल्यास डॉक्टरांवर गुन्हे दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:24 IST

शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली

नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना तंबी दिली असून, संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित टॅमिफ्लू द्याव्यात, असे आवाहन केले आहे. योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास संबंधित खासगी वैद्यकीय व्यावसायिकावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे खासगी व्यावसायिकांत संताप व्यक्त केला जात आहे.गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत एकच स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला होता आणि त्याचा मृत्यू झाला होता. परंतु यंदाच्या वर्षी मात्र रुग्ण संख्येत आणि रुग्णांच्या मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे. १ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत ९० स्वाइन फ्लू रुग्ण आढळले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ९० स्वाइन फ्लू रुग्णांपैकी ८५ रुग्ण खासगी व्यावसायिकांकडे आढळले होते. तसेच तिघांचा मृत्यू खासगी रुग्णालयातच झाला आहे. त्याचे विश्लेषण करताना संबंधित रुग्ण आधी खासगी क्लिनिकमध्ये उपचार घेतात. परंतु अशाप्रकारचे क्लिनिक चालवणारे वैद्यकीय व्यावसायिक स्वाइन फ्लू म्हणून नोंद करीत नाहीत आणि तसे उपचार करीत नाहीत. रुग्णाचा आजार बळावल्यानंतर अत्यावस्थ होऊन ते मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल होतात आणि रोगाचे प्रमाण वाढल्याने त्याचा मृत्यू होतो असे प्रकार होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोणताही रूग्ण डॉक्टरांकडे आल्यास त्याच्या परीने तो निदान करीतच असतो. परंतु जर रूग्णाला सर्दी पडसे झाले म्हणून तो उपचारासाठी क्लिनीकमध्ये दाखल झाला. तर त्यावर उपचार केल्यानंतर घरी गेलेल्या उमेदवाराचा नंतर आजार बळावल्यास डॉक्टर जबाबदार कसे काय राहणार? महापालिकेने खासगी वैद्यकिय व्यवसायिकांना रूग्णांवर सुयोग्य उपाचारासाठी आवाहन करणे ठीक परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याची भूमिका घेणे योग्य नाही.- डॉ. भालचंद्र ठाकरे, अध्यक्ष,  नाशिक जिल्हा होमीओपॅथी हॉक्टर्स असोसिएशनमहापालिकेची आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. त्यांच्याकडे दीड-दोन वर्षांपासून चांगला फिजिशियन नाही. त्याचप्रमाणे स्वाइन फ्लूसाठी तयार केलेला कक्षदेखील बंद असल्याचे सांगितले जाते. अशावेळी रुग्ण खासगी व्यावसायिकांकडेच दाखल होतात. परंतु त्यासाठी महापालिकेने खासगी व्यावसायिकांना अशाप्रकारे फौजदारी कारवाईची धमकी देणे चुकीचे आहे.  - डॉ. नितीन चितळे, सरचिटणीस, आयएमए नाशिक शाखाकोणत्याही डॉक्टरला रूग्णाचे चुकीचे निदान व्हावे आणि काही विपरीत व्हावे असे वाटत नाही. रूग्ण दाखल झाल्यानंतर जो तो आपल्या पध्दतीने निदान करीत असतो. परंतु स्वाईन फ्ल्यूची लागण झालीच तर ती खूप झपाट्याने होत असते. मुळात उपचार करणारे डॉक्टर देखील संसर्गाच्या धोक्यात असतात. त्यामुळे रूग्ण दगाविल्याचे निमित्त करून कारवाई करण्याचा इशारा देणे म्हणजे एकप्रकारची हुकूमशाहीच आहे.- डॉ. राहुल पगार, माजी अध्यक्ष, निमा

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका