शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळे नियमित न झाल्यास ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:43 IST

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास महापौर तसेच भाजपाच्या आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मठ, मंदिर समितीने दिला आहे.

ठळक मुद्देमंदिर, मठ समिती : आमदार, महापौरांच्या निवासस्थानावर धरणे; तीन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झालेला नाही. त्यामुळे तीन दिवसांत याबाबत निर्णय न झाल्यास महापौर तसेच भाजपाच्या आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मठ, मंदिर समितीने दिला आहे.रस्त्याला अडथळा ठरलेली तसेच कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी वा पुरावा नसलेली सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येणार आहे. त्यानुसार २००९ पूर्वीची ५०३ आणि त्यानंतरची ७२ अशी ५७५ धार्मिक स्थळे हटविण्याचे नियोजन आहे. तथापि, महापालिकेने यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी न केल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि आणि न्यायालयानेदेखील फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपाच्या धार्मिक स्थळे निष्कासन समितीची बैठक झाली आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले.प्रशासनाच्या बैठकीनंतर मठ, मंदिर समितीचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या वतीने महासभेत ठराव करून खुल्या जागेवरील दहा टक्के बांधकामे अनुज्ञेय असल्याने या जागेतील मंदिरे हरकती आणि सूचना मागवून नियमित करणे शक्य आहे. परंतु भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी पाठपुरावा करीत नसल्याने ते मंजूर होत नसल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तीन दिवसांत शासनाकडून महासभेच्या ठराव मंजुरीचा निर्णय न झाल्यास भाजपाच्या सर्व आमदारांच्या आणि महापौरांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती विनोद थोरात, प्रवीण जाधव, कैलास देशमुख, नंदू कहार, चंदन भास्कर यांनी दिला आहे.लवकरच अनधिकृतची यादीमहापालिकेच्या वतीने लवकरच बेकादेशीर धार्मिक स्थळांची यादी जाहीर करण्यात येणार असून, त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत.तथापि, प्रशासनाची तयारी सुरू झाली असताना गेल्या वर्षभरापासून राज्य शासनाकडे प्रलंबित असलेला खुल्या जागेवरील बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाReligious Placesधार्मिक स्थळे