शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रागारात ‘त्या’ पोलिस पित्याने पिस्तुल जमा केले असते तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:36 IST

ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्र वारी घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वादातून त्यांचा राग अनावरकदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती,

संदीप झिरवाळ, नाशिक : कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हीस रिव्हॉल्वर जमा केली असती तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.पेठरोडवरील अश्वमेधनगरच्या राजमंदिर सोसायटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरच हादरले. त्याला कारणही तसेच होते, पोलीस पिता असलेल्या भोये यांनी कौटुंबिक वादातून दोघा मुलांवर पिस्तूल रोखून चार फैरी झाडल्या होत्या. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या छातीत गोळी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सोनू चिखलकर याचा घटनास्थळी तर शुभमचा रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात बीट-मार्शल म्हणून क र्तव्य बजावणारे भोये यांना पोलीस ठाण्यातून त्यांच्या नावावर पिस्तुलसह ३० जिवंत काडतूस देण्यात आलेले होते. नियमानुसार ड्युटी संपल्यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी पोलिस ठाण्यातून दिलेले शस्त्रे, रायफल असो की रिव्हॉल्व्हर लागलीच शस्त्रगार कक्षात जमा करणे बंधनकारक असते. एवढेच काय तर एखादा पोलिस अधिकारी जर रजेवर जाणार असला तरी त्याला नियमाने पिस्तुल बाळगता येत नाही. गुरूवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असूनही भोये यांनी पिस्तुल व काडतुसे हे सोबत बाळगली. दरम्यान, कौटुंबिक वादातून त्यांचा राग अनावर झाला आणि थेट पिस्तूल काढून आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयFiringगोळीबार