शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल जमा केले असते तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:45 IST

कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.

पंचवटी : कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.पेठरोडवरील अश्वमेधनगरच्या राजमंदिर सोसायटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरच हादरले. त्याला कारणही तसेच होते, पोलीस पिता असलेल्या भोये यांनी कौटुंबिक वादातून दोघा मुलांवर पिस्तूल रोखून चार फैरी झाडल्या होत्या. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या छातीत गोळी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सोनू चिखलकर याचा घटनास्थळी तर शुभमचा रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ैबीटमार्शल म्हणून क र्तव्य बजावणारे भोये यांना पोलीस ठाण्यातून त्यांच्या नावावर पिस्तूलसह ३० जिवंत काडतुसे देण्यात आलेली होती. नियमानुसार ड्यूटी संपल्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून दिलेले शस्त्र, रायफल असो की रिव्हॉल्व्हर लागलीच शस्त्रागार कक्षात जमा करणे बंधनकारक असते. गुरुवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असूनही भोये यांनी पिस्तूल व काडतुसे सोबत बाळगली. ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे, मात्र पोलीस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.शस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावरया घटनेनंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या शस्त्रांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. ड्यूटी संपल्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांकडून आपली शस्त्रे पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात नियमितपणे जमा केली जातात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून कर्मचाºयांना कर्तव्यावर असताना दिलेले शस्त्र कर्तव्य आटोपल्यानंतर तत्काळ शस्त्रागारामध्ये जमा करण्याबाबत आदेश देणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक