शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

...तर नाशिकचा सत्यानाश झाला समजा - राज ठाकरे

By admin | Updated: February 17, 2017 22:04 IST

नाशिककरांनी माझ्यावर मागील पंचवार्षिक निवडणूकीत जो विश्वास दाखविला त्यांचा विश्वास मी सार्थ ठरविला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 17 - नाशिककरांनी माझ्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीत जो विश्वास दाखविला त्यांचा विश्वास मी सार्थ ठरविला. मी पाच वर्षांत जी कामे केली ती नाशिककरांपुढे सादर केली. आता नाशिककरांना खरा निर्णय घ्यायचा आहे. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात शहर सोपवायचं की प्रगतीच्या वाटेवर शहराला गतिमान करायचं हे नाशिककरांनी ठरवावं, असे भावनिक आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले. भाजपा, शिवसेनेच्या हातात जर शहराची सत्ता गेली तर नाशिकचा सत्यानाश झाला समजा, असे भाकित राज ठाकरे यांनी जाहीर सभेत वर्तविले.नाशिक शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते. यावेळी ठाकरे म्हणाले, चांगल्या शहरांचा सत्यानाश करण्याचे काम भाजपा, सेनेचे आहे, ते माझे नाही. या शहराची सत्ता जर भाजपा-सेनेच्या हाती गेली तर शहराची ‘वाट’ लागली समजा. शहराचं भविष्य घडवायचं असेल तर ‘इंजिन’शिवाय नाशिकला पर्याय नाही. दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाचा ‘बॉलिवूड’ला हेवा वाटेल असे स्मारक मी साकारून दाखविणार. माझ्याकडे दृष्टी आहे, मला शहरं सुंदर करण्याची आवड असून, मी टेंडरमधून पैसे खात नाही आणि खाऊही देत नाही. भ्रष्टाचार करू दिला नाही म्हणून तर अनेकांनी पक्ष सोडला. जनतेच्या पैशातून मलिदा लाटणाऱ्यांची राज ठाकरेला गरजही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे : शहरातल्या नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देणं, ती सुंदर बनवणं, घडवणं हे माझं पॅशन आहेनाशिकमध्ये ५ वर्षांत ५६० किलोमीटरचे रस्ते तयार केलेनाशिकच्या पुढच्या ४० वर्षांचा पाण्याची गरज भागवण्यासाठी मुकणे धरणातून थेट पाईपलाईन टाकली आहे. २० लाख लिटर्सच्या १७ टाक्या उभारल्याडम्पिंग ग्राउंडचा त्रास जसा इतर शहरात असतो, तसा नाशिकमध्ये पण होता, पण आम्ही तिथे घनकचऱ्यातून खत प्रकल्प उभारलानाशिकमध्ये कचरा उचलण्यासाठी जीपीएस यंत्रणेने सुसज्ज घंटागाड्या धावू लागल्यातनाशिकमध्ये लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे मिळावेत म्हणून 'चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क' उभारलंमा.बाळासाहेबांचं स्मारक कोणी पहिलं केलं या वादात मला जायचं नाही. मला जे योग्य वाटलं ते स्मारक नाशिकमध्ये उभारलंमा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं नाशिकमध्ये ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय उभारलंशिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीची प्रतिकृती मा.बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालयात आहेबोटॅनिकल गार्डनचा कायापालट व्हावा यासाठी रतन टाटांना अर्थसहाय्य करण्याची विनंती केली.त्यांनी तात्काळ मान्यता देत, १४ कोटी रुपये दिलेगोदावरी नदीच्या काठी गोदापार्क उभारावं म्हणून मुकेश अंबानींशी बोललो आणि त्यांनी होकार देत गोदापार्कच्या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिलानाशिकमध्ये उड्डाणपुलाच्या खाली एल अँड टी कंपनीशी बोलून संपूर्ण सुशोभीकरण करून घेतलं. त्यामुळे कोणतंही अतिक्रमण तिथे होत नाहीनाशिकमध्ये होळकर ब्रिजवर सुंदर वॉटर कर्टन उभारला.