शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

..अशी राबविली जाईल मतमोजणी प्रक्रिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 01:09 IST

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा अशाप्रकारे एका मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात येतील.

नाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाउस येथे सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय चौदा अशाप्रकारे एका मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात येतील. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण १६८ टेबल असतील.मतमोजणीचे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र कोणत्या विधानसभा मतदारसंघाच्या कोणत्या टेबलवर त्याची नेमणूक केली जाईल याविषयी पूरेपूर गोपनीयता पाळण्यात आली असून, प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी सकाळी सहा वाजता ‘रॅण्डम’ पद्धतीने त्याची नेमणूक करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या एका टेबलवर तीन कर्मचारी असतील. त्यात एक सूक्ष्म निरीक्षकाचा समावेश असेल. हा सूक्ष्म निरीक्षक फक्त निवडणूक आयोगाच्या अखत्यारित काम करेल. केंद्र सरकारच्या अखत्यारितील अधिकाºयांची सूक्ष्म निरीक्षक म्हणून नेमणूक केली जाईल.दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १९२ पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक व सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आकडेवारी गोळा करण्यासाठी ६४ कर्मचाºयांची तर ३६ रो आॅफिसर व १९२ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.नाशिक व दिंडोरी मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी १५० सिलिंग स्टाप असणार आहे. मतमोजणी झाल्यानंतर त्यांच्याकडून पुन्हा मतदान यंत्र सील करून ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मीडिया कॉर्डिनर म्हणून ८ अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली आहे.मतमोजणी कर्मचारी व अधिकाºयांकडून मतमोजणी प्रक्रिया राबविताना अवलंबिलेल्या पद्धतीवर हे सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवतील व तशी नोंद त्यांच्या जवळील कागदपत्रांवर घेऊन त्याबाबतचा अहवाल थेट निवडणूक निरीक्षकांना सादर करतील.जिल्ह्यात जवळपास साडेबारा हजार सर्व्हिस व्होटर असल्यामुळे या सर्वांना निवडणुकीपूर्वीच पोस्टाने व ईटीपीबीएस प्रणालीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास साडेपाच हजाराच्या आसपास मतपत्रिका पोस्टाने वा त्या त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयातील मतपेटीत टाकण्यात आल्या आहेत.पोस्टल मतपत्रिकांची अगोदर मोजणी करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. त्यासाठी दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी चार चार टेबल लावण्यात आले आहेत. एक टेबल लावण्यात यावा व प्रत्येक वेळी फक्त पाचशे मतपत्रिकांची मोजणी करावी, अशा सूचना आहेत. पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी चार उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १२ मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक, ८ सूक्ष्म निरीक्षक, ६ आकडेवारी एकत्रितकरण स्टाप व १२ शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.मतमोजणीसाठी १६० कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. सकाळी बरोबर आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येईल. सर्वात अगोदर पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू झाल्यानंतर साडेआठ वाजेनंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक यंत्रातील मतांची मोजणी सुरू केली जाईल.असे झाले मतदान...नाशिक लोकसभा मतदारसंघसिन्नर- पुरुष-१०७५८४, महिला- ८६७३२= ६४.९७ टक्केनाशिक पूर्व- पुरुष-१०६३६९, महिला- ८७७४९=५५.०६ टक्केनाशिक मध्य- पुरुष-९५०५५, महिला- ८१७२३=५५.९५ टक्केनाशिक पश्चिम- पुरुष-१२३००५, महिला- ९४०९९=५५.६१ टक्केदेवळाली- पुरुष- ८८१९५, महिला- ७१९५५ =६०.७३ टक्केइगतपुरी- पुरुष- ९५४५७, महिला- ८०५९२ =६७.६० टक्केदिंडोरी लोकसभा मतदारसंघनांदगाव- पुरुष- १००९५० महिला- ८०७१९= ५७.४९ टक्केकळवण- पुरुष- १०४४२२ महिला- ८९९५५= ७२.५३ टक्केचांदवड- पुरुष- १०२३४७ महिला- ७९३०१= ६५.०७ टक्केयेवला- पुरुष- १०३१७१ महिला- ७७५७५= ६१.१५ टक्केनिफाड- पुरुष- ९४६४७ महिला- ७४८९१= ६३.३१ टक्केदिंडोरी- पुरुष- १२२५४८ महिला- १०४१९०=७५.०५ टक्के

टॅग्स :lok sabhaलोकसभाnashik-pcनाशिक