शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर येथील मूर्ती रंगकामाचा वाद : गोरे राजीनामा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:37 IST

गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी आपण दोनच दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.

नाशिक : गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी आपण दोनच दिवसांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.  सोमेश्वर देवस्थान हे नाशिकमधील प्राचीन असून, तेथे गेल्यावर्षीच नूतन विश्वस्त नियुक्त करण्यात आले आहेत. तथापि, त्यांच्यातही गटबाजी आहे. त्यातच अध्यक्ष प्रमोद गोरे यांनी गेल्या बुधवारी मंदिरातील मुख्य शिवपिंडीला रंगकाम केल्याने वाद वाढला. मंदिराच्या परीसरातील नागरिकांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यानंतर अरुण धोंडू पाटील यांनी पोलिसांत गोरे यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या अंतर्गत पोलिसांनी शिवपिंडीची विटंबना करून भावना दुखावल्याप्रकरणी गोरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, दोन दिवसांनंतर देवस्थान ट्रस्टचा राजीनामा देणार असल्याचे प्रमोद गोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अध्यक्षपदाच्या वेळी आपण या भागाचा विकास करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार गेल्या पन्नास वर्षांत केली नाही इतकी कामे केली असल्याचा दावा त्यांनी केला. प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, अन्न छत्र, रंगरंगोटी अशी सर्व कामे स्वखर्चाने केली. परंतु गावकीच्या राजकारणाने आपली अडचण होत असून, आपल्यावर खोटे आरोप करून अडथळे आणले जात आहेत. इतकेच नव्हे तर गंभीर गुन्हा दाखल केला गेला आहे. गुन्ह्यात जामीन मिळवल्यानंतर दोन दिवसांतच राजीनामा देणार असल्याचेही ते म्हणाले.रंग दिल्याने मतभेदशनिवारी रात्री पिंडीचा रंग काढून ती पूर्ववत करण्यात आली. त्यावरून मतभेद असून, आपणच पिंडीला दिलेला रंग काढल्याचा दावा गोरे यांनी केला आहे तर गोरे आठ दिवसांपासून फरार असून, स्थानिक नागरिकांनीच ते काढून घेतल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :Templeमंदिर