शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्यायातच समतेचा विचार :  नरेश गिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:48 IST

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे,

नाशिक : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी जातीभेद निर्मूलन व सामाजिक आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक समतेचा विचार मांडला. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यायचा असेल तर वंचितांना प्रवाहात आणून त्यांच्यासाठी समता प्रस्थापित केली पाहिजे, असा विचार शाहू महाराजांनी मांडला, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.समाज कल्याण विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त सामाजिक न्याय दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेश गिते होते. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, सहायक आयुक्त श्रीमती प्राची वाजे, नगरसेवक प्रशांत दिवे, शाहू विचारांचे अभ्यासक प्राध्यापक गंगाधर आहिरे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, सहायक संचालक दीपक बिरारी व प्राध्यापक घनश्याम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. गिते यावेळी म्हणाले, सामाजिक समतेचे पहिले पाऊल राजर्षी शाहू महाराज यांनी उचलले. हे विचार आज समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोविचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचीदेखील युवकांनी कास धरली पाहिजे. सोशल मीडियाचा जपून वापर करणे तरुणांचे कर्तव्य असल्याचेही गिते म्हणाले. यावेळी प्रा. गंगाधर आहिरे यांचे ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवन व कार्य’ या विषयावर व्याख्यान झाले. भगवान वीर यांनीही यावेळी विचार मांडले.राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती प्रदानयावेळी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविलेल्या जाणाऱ्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, शासकीय निवासी शाळेत इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्र मांक प्राप्त विद्यार्थी, गटई स्टॉल, अनुसूचित जाती बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेतील अनुक्र मे प्रशांत गावले, ऋतुजा भुजबळ, खुशाल ठाकरे, रूपेश तुपे, जिभाऊ डोंगरे, आकाश डोंगरे, सुभाष डावरे, प्रशिक महिला स्वयंसहाय्यता बचतगट, गौतमी महिला स्वयंसहाय्यता बचतगट, आरती भांगे, महेश लोणके या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक