शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना नर्सरीपासून शिक्षण देण्याचा विचार: के. सी. पाडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 01:03 IST

राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले. 

ठळक मुद्देवसतिगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन

नाशिक : राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले. आदिवासी विकास विभागाच्या पेठ रोडवरील वसतिगृह परिसरात मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन ॲड. पाडवी यांच्या हस्ते कोनशिला अनावरणाने करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आदिवासी वसतिगृहांसाठी जागा व निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, आगामी कालावधीत मुलांना नर्सरीपासून शिक्षण कसे देता येईल तसेच विद्यार्थी शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही, यावर ठोस उपाययोजना करण्याबाबत विचार सुरू असून, त्याबाबत सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आहे. यावेळी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त डाॅ. हिरालाल सोनवणे, अपर आयुक्त गिरीश सरोदे, विकास पानसरे, सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होते.नवीन वसतिगृहाची वैशिष्ट्येनाशिक शहरात आदिवासी मुलांसाठी १६०५ व मुलींसाठी ६२५ क्षमतेचे वसतिगृह मंजूर आहे. भूमिपूजन होत असलेल्या इमारतीची क्षमता ३१० आहे. तळ मजल्यासह सात मजली इमारत पार्किंग, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम, स्वतंत्र अभ्यासिका, स्वतंत्र भोजनालयाची व्यवस्था, अधीक्षकांसाठी निवासाची सोय, प्रत्येक मजल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी दोन वॉटर कूलर असतील.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार