शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संकरित जनावरांत कोकणवाडीचा वळू चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:16 IST

ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या पशुपालकाला राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

घोटी : ग्रामपालिका आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती यांच्या विद्यमाने आयोजित घोटीतील डांगी, औद्योगिक, शेतकी आणि संकरित जनावरांत अव्वल चॅम्पियन येण्याचा मान अकोले तालुक्यातील कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी यांच्या वळूला मिळाला आहे. या वळूच्या पशुपालकाला राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.  घोटीतील डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचा आजच्या दुसºया दिवशी बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या समारंभात विजेत्या वळूच्या पशुपालकांना दादा भुसे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी खासदार हेमंत गोडसे हे होते.  यावेळी बोलताना दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, धरणाचा तालुका अशी ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यातील  पाण्यावर स्थानिक नागरिकांचा अधिकार नसल्याचीकल्पना शासनाला असून, या पाण्याच्या कराच्या मोबदल्यात रॉयल्टी आणि स्थानिक युवकांना रोजगार तसेच सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमित लाभार्थींना त्यांच्या नावाने जमीन आणि घरे करण्याचे शासनाच्या विचाराधिन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  या बक्षीस वितरण समारंभास माजी आमदार शिवराम झोले, काशीनाथ मेंगाळ, निवृत्ती जाधव, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे, पंचायत समिती सदस्य विठ्ठल लंगडे, मच्ंिछद्र पवार, रघुनाथ तोकडे, मूलचंद भगत, अशोक सुरडे, कुलदीप चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विष्णू गर्जे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी संभाजी आव्हाड आदी उपस्थित होते. दरम्यान, रविवारी (दि. २५) कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचा निकाल : शेरणखेल येथील वळू ठरला द्वितीय  प्रदर्शनात चॅम्पियनमध्ये कोकणवाडी येथील चंद्रकांत बेंडकुळी, डांगी आदतमध्ये प्रथम अकोले तालुक्यातील मुथळने येथील सदाशिव सदगीर, द्वितीय अकोले तालुक्यातील शेरणखेल येथील ज्ञानदेव कासार, चार दाती :- मेहदूरी, ता. अकोले भगवान वाव्हळे. सहा दाती :- चंद्रकांत बेंडकुळी, डांगी जुळलेले :- रोहित मोरे (आगसखिंड) बैलजोडी :-रमेश पोटकुळे (शेणवड खुर्द), डांगी कालवड :- सुरेश लोखंडे (धामणगाव पाट), डांगी दुभती- दादा गोडसे (मोग्रस), गाभण- नवनाथ तुपे (बेलू), खिल्लार आदत-गोविंद कडू (तळोघ), दोन दाती: चांगदेव तोकडे (देवळे) चार दाती : गोरख गिते (तळोशी), सहा दाती :- जालिंदर चव्हाण (माणिकखांब), खिल्लार बैलजोडी- झिपार आडोळे (टाके घोटी), संकरित कालवड- संदीप नागरे (नाशिकरोड), घोडा- कैलास कर्पे (नांदूरवैद्य), देवीदास भगत (घोटी वाडी) आदींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक