शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला कॉपी पुरविणाऱ्या शिक्षक पतीला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:01 IST

येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाºया शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयातील परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून, कॉपी पुरविणाºया शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारातून पळ काढला. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबंधित विद्यार्थिनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांनी दिली.

नाशिक : येथील महर्षी शिंदे डीएड महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान पत्नीला कॉपी पुरविणाºया शिक्षक पतीला रंगेहात पकडण्यात आल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयातील परीक्षा नियंत्रकांनी ही कारवाई केली असून, कॉपी पुरविणाºया शिक्षकावर कोणतीही कारवाई करण्यापूर्वीच त्यांनी महाविद्यालयांच्या आवारातून पळ काढला. मात्र परीक्षा नियंत्रकांनी संबंधित विद्यार्थिनीचा पेपर काढून घेतल्याची माहिती परीक्षा केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांनी दिली.महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालात शुक्रवारी (दि.७) सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पेपर सुरू झाल्यानंतर एक व्यक्ती संबंधित महिलेला कॉपी पुरवित असल्याचे येथील काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा प्रकार प्राचार्यांच्या लक्षात आणून दिल. या दरम्यान संशयिताला पकडून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु, केंद्रप्रमुखांना या घटनेची माहिती दिली जात असताना संशयिताने परीक्षा केंद्रातून पळ काढला.कॉपी पुरविणारा संशयित पेठ तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक असून परीक्षार्थी महिलेचा पती असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडून निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परीक्षा यंत्रणेविषयी साशंकतायाप्रकरणी केंद्रप्रमुख आर. डी. बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता आपण वरच्या मजल्यावर असल्याने या प्रकाराची उशिरा माहिती मिळाल्याचे सांगत परीक्षार्थी महिलेवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, झालेल्या प्रकार परीक्षा नियंत्रकांसमोर घडल्यानंतरही झालेल्या गोंधळानंतर संशयिताला महाविद्यालयातून पळ काढण्याची संधी मिळाल्याने महाविद्यालयातील परीक्षा यंत्रणेविषयीच साशंकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी