शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून केल्यानंतर ११वर्षांपासून फरार असलेल्या पतीला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 18:54 IST

संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता.

ठळक मुद्देदिंडोरीतून पंचवटी पोलिसांनी बांधल्या मुसक्याअकरा वर्षांपुर्वी घडला होता गुन्हा

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात लोखंडी फावडा मारत तिचा खून केल्यानंतर सुमारे ११वर्षांपासून फरार असलेला तिचा पती संशयित हल्लेखोर काशिनाथ बाळु पवार (६०) यास अखेर पंचवटी पोलिसांना बेड्या ठोकण्यास यश आले आहे. संशयिताबाबत कुठलेही ठोस पुरावे हाती नसताना केवळ गोपनीय माहितीवरुन दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथून पवार याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या.सय्यद पिंपरी रस्त्यावर आडगाव शिवारातील येथील एका शेतात मोलमजुरी करत उदरनिर्वाह करणाऱ्या पवार दाम्पत्यामध्ये खटके उडाले. ११ ऑगस्ट 2010 रोजी दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी संशयित पवार याने त्याची पत्नी गुणीबाई पवार (४५) हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने हल्ला केल्यामुळे ती जागीच ठार झाली. या घटनेनंतर पवार हा फरार झालेला होता. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र तो कोठेही मिळून आला नाही. पवार मूळ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे राहणारा असून तो पहिल्यापासून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी काम करायचा पोलिसांनी त्याच्या मूळ गावीदेखील त्याचा शोध घेतला असता पवार हा गावाकडे येतच नसल्याने कदाचित तो मयत झाला असावा अशी शक्यता वर्तविली जात होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार गुन्हे शोध पथकाने काही महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहळ येथे जाऊन संशोधनाबाबत विचारपूस केली असता पवार दिंडोरी तालुक्यातील डंबाळेवाडी येथे एका शेतात मोलमजुरी करत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या केवळ नावावरून शोध घेतला असता तो डंबाळेवाडीत आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ११ वर्षांपूर्वी पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. पवार यास बुधवारी (दि.१२) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक